Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 5:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत. आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आमचा छळ करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत; आम्ही शिणलो आहोत, आम्हांला विश्रांती नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही दमलो आहोत. आम्हास विश्रांती नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 5:5
14 Iomraidhean Croise  

माझी पापे गुलामगिरीचे जोखड बनली आहेत; त्यांच्या हातांनी ती एकत्र विणली गेली आहेत. ती माझ्या गळ्यात अडकविण्यात आली आहेत, आणि प्रभूने माझी शक्ती खचविली आहे. मी ज्यांचा सामना करू शकत नाही, त्यांच्या हाती मला दिले आहे.


सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: या सर्व राष्ट्रांच्या मानेवर मी लोखंडी जोखड ठेवले आहे, त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची गुलामगिरी करण्यास लावेन, व ते करतील. मी वनपशूही त्याच्या ताब्यात देईन.’ ”


“ ‘ “जर, कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, असे याहवेह घोषित करतात, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही.


म्हणून तुम्ही याहवेहने पाठविलेल्या तुमच्या शत्रूंचे गुलाम व्हाल आणि तुम्ही भुकेले, तहानलेले, नग्न आणि अत्यंत गरीब असे व्हाल आणि ते तुमचा नाश करेपर्यंत तुमच्या मानेवर लोखंडी जू ठेवण्यात येईल.


तेव्हा आता, जे जू आपल्याला व आपल्या पूर्वजांना वाहवयास अशक्य होते, ते गैरयहूद्यांना वाहवयास लावून तुम्ही जणू परमेश्वराची परीक्षा पाहता काय?


माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.


आमचा पाठलाग करणारे आकाशातील गरुडांपेक्षा वेगवान आहेत; ते पर्वतांवरही आम्हाला शोधून काढतात आणि वाळवंटात आमची वाट पाहत दबा धरून बसलेले असतात.


याहवेहनी मला असे म्हटले आहे: “चामड्याच्या वाद्यांचा व गुणाकार चिन्हाच्या सळयांचा एक जू तयार कर आणि तो तुझ्या मानेवर ठेव.


सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “बाबेलची दुर्गम तटबंदी भुईसपाट होईल आणि तिच्या उंच वेशी अग्नीने भस्म करण्यात येतील; लोकांचे कष्ट व्यर्थ ठरतील, देशाने केलेले श्रम अग्नीचे जळण होईल.”


म्हणून याहवेह म्हणतात: “मी या लोकांविरुद्ध विपत्ती योजत आहे, ज्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. तुम्ही पुन्हा कधीही गर्वाने चालणार नाही, कारण तो आपत्तीचा काळ असेल.


पीडा व कठोर परिश्रम केल्यानंतर यहूदाह बंदिवासात गेली आहे. ती अन्य राष्ट्रांमध्ये राहते; आता तिला कुठेही आराम मिळत नाही. जे तिचा पाठलाग करीत असत, त्यांनी तिच्या पीडित परिस्थितीत तिला मागे टाकून दिले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan