Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 5:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आमचे वतन अपरिचितांना देण्यात आले आहे, आमची घरे परकियांनी दिली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आमचे वतन परक्यांच्या हातात गेले आहे. आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 5:2
13 Iomraidhean Croise  

त्याची सर्व मालमत्ता सावकार हिरावून घेवो; आणि त्याने कष्टाने मिळविलेले सर्वकाही परके लुटोत.


तुमचा देश उद्ध्वस्त झाला आहे, तुमची शहरे अग्नीमध्ये जळाली आहेत; पाडाव केल्यानंतर करावे तसे, तुमच्यादेखत तुमची शेते परदेशीयांनी ओरबाडून घेतली आहेत.


तेव्हा मेंढरे स्वतःच्या कुरणात चरत असल्यासारखी चरतील; श्रीमंतांच्या अवशेषांमध्ये कोकरे चरतील.


थोड्या काळाकरिता तुमच्या लोकांनी तुमच्या पवित्र भूमीचा ताबा घेतला, परंतु आता आमच्या शत्रूंनी तुमच्या पवित्रस्थानास तुडविले आहे.


तुमच्याच चुकीमुळे मी तुम्हास दिलेले वतन तुम्ही घालवाल. तुमच्या शत्रूंकडे, तुम्हाला माहीत नसलेल्या राष्ट्रांत मी तुम्हाला गुलाम म्हणून पाठवेन. कारण तुम्ही माझा क्रोधाग्नी पेटविला आहे आणि तो सतत जळत राहील.”


त्यांची घरे दुसऱ्यांना देण्यात येतील, ते त्यांची शेते व त्यांच्या स्त्रियाही इतरांना दिल्या जातील, जेव्हा माझा हात मी या देशात राहणाऱ्या लोकांविरुद्ध उगारेन, तेव्हा हे घडेल,” असे याहवेह जाहीर करतात.


मी त्यांची संपत्ती परदेशीयांना लूट अशी देईन आणि पृथ्वीतील दुष्ट ते लुबाडून घेतील, व ते भ्रष्ट करतील.


सर्वात दुष्ट राष्ट्रांना मी आणेन जे त्यांच्या घरांचा ताबा घेतील. बलवानाच्या गर्वाचा मी शेवट करेन, आणि त्यांची पवित्रस्थाने भ्रष्ट होतील.


“ते वारा पेरतात आणि ते वावटळीची कापणी करतात. त्यांच्या पिकांना कणसे येत नाहीत; त्यातून पीठ तयार होत नाही. जर त्यातून अन्न तयार झाले तर परकीय ते गिळून टाकतील.


इस्राएलास गिळून टाकण्यात आले आहे; राष्ट्रांमध्ये ती कोणासही आवडत नाही.


या लोकांची मालमत्ता लुटली जाईल, यांचीच घरे ढासाळून टाकली जातील, जरी त्यांनी घरे बांधली असतील, त्या घरात ते राहू शकणार नाहीत; जरी त्यांनी द्राक्षमळा लावला असेल, द्राक्षांचा रस ते पिणार नाहीत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan