Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांचे अधिपती हिमापेक्षा अधिक तेजस्वी आणि दूधापेक्षा अधिक धवल होते, त्यांचे देह माणकांपेक्षा अधिक तुकतुकीत, सशक्त व निरोगी त्यांची देहरचना नीलरत्नापेक्षा अधिक तेजस्वी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तिचे सरदार1 बर्फाहून स्वच्छ होते, दूधाहून पांढरे होते; ते पोवळ्याहून कांतीने लाल होते; त्यांचे तेज नीलमण्यासारखे होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तिचे सरदार बर्फासारखे चकाकत असत व दुधापेक्षा पांढरे होते. ते पोवळयांसारखे कांतीने लाल होते. त्यांचे तेज जणू काही नीलमण्यासारखे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 4:7
15 Iomraidhean Croise  

ओफीराचे सोने, मोलवान गोमेद किंवा नीलमणी, यांनीही त्याचे मोल करता येणार नाही.


प्रवाळ व सुर्यकांतमणींचा तर उल्लेखच नको; ज्ञानाचे मोल माणकांपेक्षाही खूपच अधिक आहे.


मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या परिपक्व रोपांसारखे होतील; आमच्या कन्या, राजमहालाच्या सजावटीसाठी केलेल्या कोरीव स्तंभासारख्या होतील.


एजोबाने मला स्वच्छ करा, म्हणजे मी शुद्ध होईन; मला धुवा, म्हणजे मी हिमाहून पांढरा होईन.


आणि त्यांनी इस्राएलाच्या परमेश्वराला पाहिले. त्यांच्या पायाखाली नीलकांत पाषाणाच्या चिरेबंदी कामासारखे अगदी निरभ्र आकाशासारखे होते.


माझा प्रियकर तेजस्वी आणि लालबुंद, दहा हजारात श्रेष्ठ आहे.


त्याचे पाय शुद्ध सोन्याच्या कोंदणात बसविलेले संगमरवरी स्तंभच आहेत. त्याचे रूप लबानोनासारखे आहे, उत्तम देवदारूसारखे आहे.


दहा दिवसानंतर राजाचे भोजन खाणार्‍या तरुणापेक्षा ते स्वस्थ आणि धष्टपुष्ट दिसू लागले.


तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल.


कारण तू गर्भवती होशील आणि पुत्राला जन्म देशील, गर्भावस्थेपासूनच तो परमेश्वराला समर्पित नाजीर असा होईल म्हणून त्याच्या केसाला वस्तऱ्याचा स्पर्श करू नकोस, कारण इस्राएलला पलिष्ट्यांच्या हातून सोडविण्यास तोच नेतृत्व करेल.”


परंतु त्याने मला सांगितले, ‘तू गर्भवती होशील आणि एक पुत्रास जन्म देशील. आतापासून द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नको, अशुद्ध असे काहीही खाऊ नको, कारण ते बाळ, तो पुत्र गर्भावस्थेपासून त्याच्या मृत्यूपर्यंत परमेश्वराचा नाजीर असा होईल.’ ”


म्हणून त्याने तिला सर्वकाही सांगितले, “माझ्या डोक्यावर कधीही वस्तरा वापरला नाही,” तो म्हणाला, “कारण मी माझ्या आईच्या उदरात होतो तेव्हापासून मी परमेश्वराला समर्पित एक नाजीर आहे. जर माझे केस कापले गेले, तर माझी शक्ती मला सोडून जाईल आणि मी दुसर्‍या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन बनेन.”


तेव्हा इशायाने त्याला बोलावून आणले. तो तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला देखणा असा होता. तेव्हा याहवेह म्हणाले, “ऊठ आणि त्याला अभिषिक्त कर, हाच तो आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan