Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याने माझ्याभोवती कुंपण केले म्हणून माझ्याने बाहेर पडवत नाही; त्याने माझी बेडी भारी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्याने माझ्याभोवती तटबंदी केल्याने त्यातून माझी सुटका होऊ शकत नाही. त्याने माझे बंध अधिक मजबूत केले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:7
11 Iomraidhean Croise  

मी पार जाऊ नये म्हणून परमेश्वराने माझी वाट अडविली आहे; त्यांनी माझे मार्ग अंधाराने झाकून टाकले आहेत.


ज्याचा मार्ग गुपित आहे, ज्याला परमेश्वराने सुरक्षित ठेवले आहे अशा मनुष्याला जीवन का दिले आहे?


माझ्या जिवलग मित्रांना माझ्यापासून दूर करून, त्यांना माझा वीट येईल, असे तुम्ही केले आहे. मी कोंडलेला असून त्यातून बाहेर पडू शकत नाही.


वेदनेने माझे डोळे म्लान झाले आहेत. याहवेह, मी रोज तुमचा धावा करतो; हात पसरून तुमच्याकडे विनंती करतो.


मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला.


आज मी तुझ्या हातातील बेड्या काढून तुला मोकळे करतो. माझ्याबरोबर बाबेलला यावे अशी तुझी इच्छा असेल तर चल. मी तुझा सांभाळ करेन; पण तिकडे यावे असे तुला वाटत नसेल, तर येऊ नकोस. संपूर्ण देश तुझ्यासमोर आहे, तुझ्या मनात येईल तिकडे जा.”


माझी पापे गुलामगिरीचे जोखड बनली आहेत; त्यांच्या हातांनी ती एकत्र विणली गेली आहेत. ती माझ्या गळ्यात अडकविण्यात आली आहेत, आणि प्रभूने माझी शक्ती खचविली आहे. मी ज्यांचा सामना करू शकत नाही, त्यांच्या हाती मला दिले आहे.


मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे.


पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत. आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच.


आमच्यावर मोठी संकटे आणून तुम्ही आम्हाला आणि आमच्या अधिपतींविरुद्ध दिलेले वचन पूर्ण केले आहे. संपूर्ण स्वर्गाच्या खाली असे काहीही झाले नाही, जसे यरुशलेमसोबत करण्यात आले.


म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी झाडांचे कुंपण घालेन; मी तिच्यापुढे अशी आडभिंत उभी करेन की तिला तिच्या वाटा सापडणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan