विलापगीत 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 बागेसारख्या आवासांना त्यांनी उकिरड्यागत केले आहे; त्यांच्या भेटण्याचे स्थान नष्ट केले आहे. याहवेहने सीयोनला तिच्या सर्व निर्धारित उत्सव व शब्बाथाचे विस्मरण केले आहे; राजे व याजक या दोघांना त्यांनी क्रोधित तिरस्काराने नाकारले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे; त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे; परमेश्वराने, सण व शब्बाथ ह्यांचा सीयोनेत विसर पाडला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाने राजा व याजक ह्यांचा धिक्कार केला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 एखाद्या बागेप्रमाणे त्याने निवासमंडपावर हल्ला केला आहे. त्याने पवित्र सभास्थान उध्वस्त केले. सियोनेत पवित्रसण व शब्बाथ याचा विसर परमेश्वराने घडवून आणिला आहे कारण त्याने आपला क्रोध राजे आणि याजका यांवर प्रकट करून त्यांना तुच्छ लेखिले आहे Faic an caibideil |