विलापगीत 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती
4 शत्रूसारखे त्यांनी धनुष्य वाकविले आहे; त्यांचा उजवा हात सज्ज झाला आहे. शत्रूसारखे त्यांनी नयनरम्य तरुणांचा संहार केला आहे. त्यांनी त्यांच्या क्रोधाग्नीचा सीयोन कन्येच्या तंबूवर वर्षाव केला आहे.
4 त्याने वैर्याप्रमाणे आपले धनुष्य वाकवले आहे, तो आपला उजवा हात उगारून शत्रूप्रमाणे उभा राहिला आहे; दृष्टीस रम्य असे सर्व त्याने मारून टाकले आहेत; त्याने सीयोनकन्येच्या तंबूवर अग्नीप्रमाणे आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे.
4 त्याने शत्रूंप्रमाणे आमच्या दिशेने आपला धनुष्य वाकविला आहे. त्याने युद्धासमान संघर्षाचा पवित्र घेऊन शत्रूप्रमाणे आम्हावर बाण चालविण्यास आपल्या हाताने नेम धरिला आहे. त्याच्या दृष्टीस बहूमूल्य लोकांची त्याने हत्या केली. सियोनकन्येच्या तंबूवर त्याने आपला क्रोध अग्नीसारखा ओतला आहे.
“जा आणि माझ्यासाठी आणि इस्राएल आणि यहूदीयामध्ये जे लोक राहत आहेत, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर आला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.”
कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हस्तकृतींनी माझा राग पेटविला गेला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’
म्हणूनच याहवेहने आपला क्रोधाग्नी आणि लढाईचा विध्वंस त्यांच्यावर ओतला. चारही बाजूने ते ज्वालांनी वेढले गेले होते, तरीसुद्धा त्यांना उमगले नाही; ज्वालांनी ते भस्म झाले, पण त्यांनी ते मनावर घेतले नाही.
तरीही त्यांनी बंड केले व याहवेहच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. म्हणून याहवेह मागे वळले व त्यांचे शत्रू झाले आणि याहवेहने स्वतः त्यांच्याविरुद्ध लढा दिला.
माझा तंबू धुळीला मिळाला आहे; त्याच्या सर्व दोऱ्या तुटल्या आहेत. माझी मुले माझ्यापासून दूर गेली आहेत आणि नाहीशी झाली आहेत; माझा तंबू उभारण्यासाठी कोणीही राहिले नाही, माझे निवासस्थान पुन्हा बांधण्यास कोणीही नाही.
दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका: “ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा; दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे अशांना त्यांच्या हातातून सोडवा, नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे— हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही.
तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; त्यांना तुझी चिंता नाही; एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे निर्दयागत मी तुला शासन केले, कारण तुझा अपराध फार मोठा आहे तुझी पातके पुष्कळ झाली आहेत.
अहो यहूदीया आणि यरुशलेम निवासियांनो याहवेहसाठी तुमची सुंता करा, तुमच्या अंतःकरणाची सुंता करा, नाहीतर माझा राग भडकेल व अग्नीसारखा भडकेल कारण तुम्ही पापे केली आहेत— तो क्रोधाग्नी कोणालाच विझविता येणार नाही.”
कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘यरुशलेमच्या लोकांवर माझ्या रागाचा व क्रोधाचा वर्षाव झाला, तसाच तुम्ही इजिप्तमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्यावर होईल. तिथे तुम्ही घृणा, शाप व उपहासाचा विषय व्हाल; तुम्हाला हा देश परत कधी दिसणार नाही.’
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी माझा कोप आणि माझा क्रोध मी या जागेवर ओतेन—लोक, पशू, वृक्ष, आणि रोपे भस्मसात होतील—आणि तो अग्नी भडकेल व तो न शमणार नाही.
त्यांनी उच्च स्थानातून अग्नी पाठविला आहे व तो माझ्या हाडांमध्ये जळत आहे. त्यांनी माझ्या पावलात सापळा पसरविला आहे व मला मागे वळविले आहे. त्यांनी मला उद्ध्वस्त केले आहे, मी दिवसभर मूर्छित होत आहे.
प्रभू शत्रूसारखे झाले आहेत; त्यांनी इस्राएलला गिळंकृत केले आहे. त्यांनी तिचे सर्व राजवाडे गिळंकृत केले आहेत आणि दुर्ग उद्ध्वस्त केले आहेत. यहूदीया कन्येचा शोक व विलाप त्यांनी बहुगुणित केला आहे.
याहवेहने त्यांच्या क्रोधास निर्बंध सोडले आहे; त्यांचा अत्यंत भयानक क्रोध ओतला गेला आहे. त्यांनी सीयोनमध्ये अग्नी पेटविला त्या अग्नीने तिच्या पायांना भस्म करून टाकले आहे.
मी तुम्हाला राष्ट्रांमधून आणेन आणि ज्या ठिकाणी तुम्ही पांगला आहात त्या देशांमधून; बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधवृष्टी करीत मी तुम्हाला एकत्र करेन.
“आणि तू, हे मानवपुत्रा, ज्या दिवशी मी त्यांचे बलवान दुर्ग, त्यांचा हर्ष आणि गौरव, त्यांच्या डोळ्यांचा आनंद, त्याच्या हृदयाची इच्छा आणि त्यांची मुले व मुली सुद्धा काढून घेईन;
“तेव्हा माझा राग शांत होईल आणि त्यांच्याविषयी असलेला क्रोध कमी होईल आणि माझा सूड पूर्ण होईल. जेव्हा त्यांच्यावरील माझा क्रोध संपेल, तेव्हा ते जाणतील की मी याहवेह आपल्या ईर्षेने बोललो आहे.
मी तुम्हापासून आपले मुख फिरवेन आणि तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल. ज्यांचा तुम्ही द्वेष करता तेच तुमच्यावर सत्ता गाजवतील आणि कोणी पाठलाग करीत नसतानाही तुम्ही पळाल.
याहवेह ईर्ष्यावान व सूड घेणारे परमेश्वर आहेत; याहवेह सूड घेणारे आणि क्रोधाने भरलेले आहेत. त्यांच्या शत्रूंचा ते सूड घेतात आणि आपला कोप त्यांच्याविरुद्ध मोकळा करतात.
कारण माझा क्रोधाग्नी प्रदीप्त होत आहे, तो थेट अधोलोकापर्यंत खोलवर पेटणार आहे. तो पृथ्वी व तिच्यावरील सर्व पिके जाळून टाकील, आणि तिच्या पर्वतांच्या पायांना अग्नी लावील.