Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ते त्यांच्या मातांना विचारत आहेत, “द्राक्षारस व धान्य कुठे आहे?” ते नगराच्या रस्त्यांवर घायाळ झालेल्याप्रमाणे बेशुद्ध होऊन पडत आहेत, त्यांच्या मातांच्या बाहूत या मुलांचे प्राण हळूहळू निघून जात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला, तेव्हा ती आपल्या मातांना म्हणाली, “धान्य व द्राक्षारस कोठे आहेत?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 ती मुले त्यांच्या मातांना म्हणतात, “धान्य आणि द्राक्षरस कोठे आहेत” घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्च्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 2:12
9 Iomraidhean Croise  

“आणि आता माझे जीवन संपुष्टात आले आहे; पीडेच्या काळाने माझ्यावर पकड घट्ट केली आहे.


या गोष्टींची आठवण करून माझा आत्मा तुटत आहे: कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्‍या विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो. त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.


माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा; आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा, कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला


कारण तुझी लेकरे ग्लानी येऊन, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात पडली आहेत, हरिणाप्रमाणे ते जाळ्यात अडकलेले आहेत. याहवेहच्या क्रोधाने आणि तुमच्या परमेश्वराच्या धमकीने भरले आहेत.


म्हणूनच महान लोकांसह मी त्याला वतन देईन, आणि अनेक सामर्थ्यशाली लोकांसह लूट वाटून घेईल. कारण त्याने आपले जीवन मरेपर्यंत ओतले, आणि अपराधी लोकांत त्याची गणना झाली. त्याने अनेकांचा पापाचा भार वाहिला, आणि पाप्यांसाठी मध्यस्थी केली.


ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील, तुमचे पुत्र व कन्या यांना गिळंकृत करतील, गाईगुरे व शेळ्यामेंढ्यांचे कळप हे देखील गिळंकृत करतील, आणि तुमची द्राक्षे व अंजिरेही गिळंकृत करतील. त्यांच्या तलवारीने ते तुमची जी भिस्त म्हणून तुम्ही समजता ती तटबंदीची नगरे ते नाश करतील.


अन्नाचा शोध घेत असताना तिचे लोक कण्हत आहेत; मौल्यवान वस्तूच्या मोबदल्यात ते अन्न विकत घेत आहेत जेणेकरून ते जिवंत राहतील. “हे याहवेह, पाहा आणि याकडे लक्ष द्या, मी कशी घृणास्पद झाले आहे.”


तहानेमुळे शिशूंच्या जिभा टाळूला चिकटल्या आहेत; भाकरीसाठी लेकरे याचना करीत आहेत, पण त्यांना कोणीही देत नाही.


मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन आणि माझी तलवार त्याच्या हाती देईन पण फारोहचे हात मोडेन आणि तो बाबेलच्या राजासमोर मरणपंथास टेकलेल्या घायाळ मनुष्याप्रमाणे कण्हेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan