Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तिची अशुद्धता तिच्या वस्त्राला चिकटली आहे; तिने तिच्या भविष्याचा विचार केला नाही. तिचे पतन अचंबित करून सोडणारे होते; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे याहवेह, माझी दुर्दशा पाहा, शत्रू विजयी झाला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे; ती आपला अंतकाळ स्मरली नाही; म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझी विपत्ती पाहा! वैरी तोरा मिरवत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्राला लागला आहे, तिने आपल्या भविष्यातील शिक्षेचा नीट विचार केला नाही. ती खूपच अधोगतीस गेली आहे. तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझे दु:ख पाहा! कारण शत्रू त्याच्या मोठेपणाचा तोरा मिरवितो आहे ते पाहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:9
46 Iomraidhean Croise  

मला होत असलेल्या त्रासाकडे कदाचित याहवेह पाहतील आणि या शापाऐवजी मी गमावलेला त्यांच्या कराराचा आशीर्वाद मला मिळवून देतील.”


इस्राएलातील प्रत्येकजण, मग तो गुलाम असो वा स्वतंत्र असो, त्यांचा फार छळ होत आहे हे याहवेहने पाहिले; त्यांना साहाय्य करणारे कोणीही नव्हते.


“म्हणून आता, हे आमच्या महान, पराक्रमी व भयावह परमेश्वरा, तुम्ही तुमच्या प्रीतीचे वचन पाळता, म्हणून ज्या हालअपेष्टा आम्ही सहन केल्या, त्यांना तुमच्या नजरेत क्षुल्लक मानू नका—जी आमच्यावर, आमच्या राजांवर व अधिकार्‍यांवर, आमच्या याजक व संदेष्ट्यांवर, आमच्या पूर्वजांवर व तुमच्या सर्व लोकांवर, अश्शूरी राजाच्या राजवटीपासून आतापर्यंत संकटे आली.


माझ्या दुःखाकडे पाहा आणि मला त्यातून सोडवा, कारण मी तुमच्या आज्ञा विसरलो नाही.


या दुष्ट लोकांची अभिलाषा पूर्ण होऊ देऊ नका, याहवेह, त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नका. सेला


माझे क्लेश आणि माझ्या वेदना पाहा आणि माझ्या सर्व पातकांची क्षमा करा.


अन्न म्हणून त्यांनी मला विष दिले, तहान भागविण्यासाठी त्यांनी मला आंब दिला.


आणि इजिप्तमधील तुमच्या या दुःखातून तुम्हाला बाहेर काढून कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोक राहत असलेल्या दूध व मध वाहत्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याचे मी वचन दिलेले आहे.


नंतर याहवेहने त्याला सांगितले, “इजिप्त देशातील माझ्या लोकांचे हाल मी बघितले आहे. त्यांच्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांचे रडणे मी ऐकले आहे आणि त्यांच्या दुःखाविषयी मला चिंता आहे.


तेव्हा या गोष्‍टीवर त्यांनी विश्वास केला. आणि जेव्हा त्यांनी हे ऐकले की याहवेहने इस्राएली लोकांची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे, तेव्हा सर्वांनी नमन करून उपासना केली.


मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला: पीडितांचे अश्रू मी पाहिले— आणि त्यांचे सांत्वन करणारा असा कोणी नाही. छळ करणार्‍यांच्या हाती अधिकार होते— आणि त्यांचे सांत्वन करणारे कोणी नव्हते.


यरुशलेम डगमगत आहे, यहूदीया कोसळत आहे; त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत, त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला.


हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे सर्व शब्द ऐका.


तू कोणाचा उपहास व निंदा केलीस? तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास, गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस? इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस!


कारण तू माझ्यावर संतापतो व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे, मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन व तुझ्या तोंडात लगाम घालेन आणि मग तू आलास त्याच वाटेने तुझ्याच देशात तुला परत नेईन.


कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”


यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, आणि तिला असे घोषित करा की, तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, तिच्या पापाची परतफेड झाली आहे, याहवेहच्या हातातून तिला तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.


तू म्हटले, ‘मी सदैव अस्तित्वात आहे— सर्वकाळाची राणी आहे!’ परंतु तू या गोष्टींचा विचार केला नाहीस किंवा परिणामी काय होऊ शकेल याकडे लक्ष दिले नाही.


ओसाडी आणि विध्वंस, दुष्काळ आणि तलवार ही दुप्पट अरिष्टे तुझ्यावर आली आहेत— कोण तुझे सांत्वन करू शकेल? कोण तुझे दुःखपरिहार करू शकेल?


“हे पीडित नगरी, वादळांनी फटकारलेल्या व सांत्वन न पावलेल्यांनो, पाचूरत्नांनी मी तुमची पुन्हा उभारणी करेन, व तुमचा पाया मौल्यवान नीलमणींवर करेन.


तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे, व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती! डोंगरावर आणि शेतात चाललेली तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत. हे यरुशलेम, तुला धिक्कार असो! तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?”


शोक करणार्‍यांना अन्न देऊन कोणी त्यांचे—त्यांच्या आई वा वडिलांच्या मृत्यूबद्दल—समाधान करणार नाही. सांत्वन करण्यासाठी कोणी त्यांना प्यालाभर द्राक्षारसही देणार नाही.


निष्पाप लोकांच्या रक्ताने तुमची वस्त्रे माखली आहेत, तुमच्या घरात चोरी करण्यासाठी शिरतांना त्यांना तुम्ही बघितले नाही. असे सर्व असूनही


“तिला एखाद्या दारुड्यागत होऊ दे, कारण तिने याहवेहविरुद्ध बंड केले आहे. मोआबभूमी आपल्याच वांतीत लोळू दे; तिला उपहासाचा विषय होऊ दे.


संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात, याजक स्वतःचेच अधिकार चालवितात, आणि माझ्या लोकांना ते आवडते. पण शेवटी तुम्ही काय करणार आहात?


“धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. नगरीला वेढा घाला; कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. तिच्या कृत्याची परतफेड करा; तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला उद्दामपणे तुच्छ लेखले,


सीयोन हात पसरीत आहे, पण तिचे सांत्वन करण्यास कोणीही नाही. कारण याहवेहने याकोबाविषयी फर्मान काढले आहे तिचे शेजारीच तिचे शत्रू होवोत; तिच्या शेजाऱ्यामध्ये यरुशलेम अमंगळ वस्तूसारखी झाली आहे.


“लोकांनी माझे कण्हणे ऐकले आहे, पण माझे सांत्वन करण्यास कोणीही नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझ्या संकटांबद्दल ऐकले आहे तुम्ही जे केले ते पाहून त्यांना आनंद झाला आहे; तुम्ही घोषणा केलेला दिवस येवो म्हणजे ते देखील माझ्यासारखेच होतील.


हे यरुशलेमकन्ये, सर्व जगात असले दुःख मी तुला काय म्हणू? मी तुझी तुलना कशाशी करू? मी तुला कोणा समान लेखू? जेणेकरून मी तुझे सांत्वन करू शकेन? हे सीयोनच्या कुमारी कन्ये? तुझा घाव सागराएवढा खोल आहे. तुला कोण बरे करू शकेल?


सोन्याची चमक कशी नाहीशी झाली आहे, उत्तम सोने निस्तेज झाले आहे! पवित्र रत्ने प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात विखुरली आहेत.


हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा; आमच्या अपमानाकडे लक्ष द्या.


“म्हणून तिला मी भुलविणार; तिला रानात घेऊन जाईन आणि तिच्याबरोबर कोमलतेने बोलेन.


त्यांना त्यांच्या गर्विष्ठपणाचे हे प्रतिफळ मिळेल. कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहच्या लोकांचा अपमान व उपहास केला.


आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.


तेव्हा आम्ही याहवेहचा, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराचा धावा केला आणि याहवेहने आमचे गार्‍हाणे ऐकले, आमच्या अडचणी जाणल्या आणि आमच्यावर होत असलेला जुलूम व अत्याचार त्यांनी पाहिला.


पण मला शत्रूच्या फुशारक्यांची धास्ती वाटली, ते कदाचित गैरसमज करतील, आणि म्हणतील, ‘आम्ही आमच्या बाहुबलानेच विजय मिळविला आहे; याहवेहने यातील काहीही केले नाही.’ ”


हे लोक सुज्ञ असते आणि जर त्यांना हे कळले असते तर किती बरे झाले असते, आणि त्यांचा अंत कसा होणार हे त्यांना समजले असते!


कारण ही वेळ न्यायनिवाडा करण्याची आहे आणि त्याची सुरुवात परमेश्वराच्या घराण्यातील लोकांपासून होत आहे; आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून झाली तर, जे परमेश्वराच्या शुभवार्तेप्रमाणे चालत नाहीत त्यांचे काय होईल?


आणि तिने एक शपथ घेतली, ती म्हणाली, “हे सर्वसमर्थ याहवेह, जर तुम्ही तुमच्या दासीच्या दुर्दशेकडे लक्ष द्याल आणि माझी आठवण कराल आणि तुमच्या दासीला विसरणार नाही परंतु तिला एक पुत्र द्याल, तर मी त्याला त्याच्या आयुष्याचे सर्व दिवस याहवेहसाठी देईन आणि त्याच्या डोक्यावर कधीही वस्तरा फिरणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan