Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 यरुशलेमच्या या पीडित व भटकंतीमध्ये ती तिच्या समृद्धीचे स्मरण करते जे तिचे गतवैभवाचे दिवस होते. जेव्हा तिचे लोक शत्रूच्या हातात पडले, तिला साहाय्य करणारे कोणीही नव्हते. तिचे शत्रू तिच्याकडे बघतात, आणि तिच्या विध्वंसामुळे तिचा उपहास करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 यरुशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसांत आपल्या सर्व प्राचीन रम्य वस्तूंचे स्मरण करते; जुलूम करणार्‍याच्या हाती तिचे लोक लागले तेव्हा तिला कोणी साहाय्यकर्ता नव्हता; तिच्या शत्रूंनी तिला पाहून ती उजाड झाली म्हणून तिची थट्टा मांडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 यरूशलेम आपल्या कष्टाच्या व बेघर होण्याच्या दिवसात, पूर्वी तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टीं आठवते. तिच्या लोकांस वैऱ्यांनी पकडले आणि तिला मदत करणारे कोणीही नव्हते. तिच्या शत्रूंनी तिला पाहिले व तिच्या ओसाडपणात तिच्यावर हसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:7
23 Iomraidhean Croise  

“माझे गेलेले महिने, ज्यामध्ये परमेश्वराची नजर माझ्यावर होती, त्या दिवसांची मला खूप आस आहे,


या गोष्टींची आठवण करून माझा आत्मा तुटत आहे: कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्‍या विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो. त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.


परमेश्वरा, मी कण्हत तुमचे स्मरण करतो; मी मनन करताना माझा आत्मा क्षीण झाला आहे. सेला


आमच्या शेजार्‍यांसाठी व सभोवती असणार्‍यांसाठी, आम्ही तिरस्काराचे, तुच्छतेचे आणि उपहासाचे पात्र झालो आहोत.


तुमची पवित्र शहरे ओसाड झाली आहेत; सीयोनही ओसाड झाले आहे, यरुशलेम तर उजाड रान झाले आहे.


जिथे आमच्या पूर्वजांनी तुमची स्तुतिप्रशंसा केली, ते आमचे पवित्र व वैभवी मंदिर बेचिराख झाले आहे, आणि आम्ही जोपासलेल्या सर्व वस्तूंची राखरांगोळी झाली आहे.


“इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने माझा संदेश विचारण्यासाठी तुला पाठविले आहे, तर त्याला सांग, ‘फारोहचे सैन्य इजिप्तमधून तुमच्या साहाय्यासाठी आले असले, तरी ते इजिप्तला परत जातील.


इस्राएलही तुमच्या उपहासाचा विषय नव्हता का? ती चोरांच्यामध्ये पकडली गेली का, कारण जेव्हाही तिचा उल्लेख होतो, घृणाभावनेने तुम्ही आपली मान हालविता नाही का?


शिवाय, मदतगार शोधून आमची दृष्टी मंद झाली आहे; जे आमच्या मदतीसाठी येणार नाहीत अशा राष्ट्रांवर आमच्या बुरुजांवरून आम्ही लक्ष ठेवले.


अम्मोन्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जेव्हा माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, आणि इस्राएल देश ओसाड झाला व जेव्हा यहूदीयाचे लोक बंदिवासात गेले, तेव्हा तुम्ही “आहा!” असे म्हटले,


कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: कारण तुम्ही टाळ्या वाजविल्या व उड्या मारल्या आणि इस्राएल देशाप्रती आपल्या हृदयात द्वेष ठेऊन आनंद केला,


ती तिच्या प्रियकरांमागे धावेल, पण त्यांना गाठू शकणार नाही. ती त्यांना शोधेल, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी आता माझ्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण माझी परिस्थिती सध्यापेक्षा तेव्हा चांगली होती.’


पण आता पुष्कळ राष्ट्रे तुमच्याविरुद्ध एकत्र झाली आहेत. ते म्हणतात, “तिला अशुद्ध होऊ द्या, आपण सीयोनेवर दुष्ट नजर टाकून आनंद करू!”


“शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे.


“परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, तुझ्या आयुष्यात तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, पण लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, म्हणून तो आता सांत्वन पावत आहे आणि तू क्लेश भोगीत आहेस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan