Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तिचे प्रतिपक्षी तिचे मालक बनले आहेत; तिचे शत्रू सुखात आहेत. याहवेहने तिला दुःख दिले आहे, कारण तिने अनेक पापे केली आहेत. तिचे बालक बंदिवासात गेले आहेत. ते तिच्या शत्रूचे गुलाम झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे; तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत; कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे; वैर्‍यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तिचे शत्रू तिचे धनी झाले आहेत; तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे. परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दु:ख दिले आहे. तिची मुले वैऱ्यांच्यापुढे पाडावपणांत गेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:5
38 Iomraidhean Croise  

त्यांचे पूर्वज इजिप्तमधून बाहेर आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी माझ्या दृष्टीने जे वाईट आहे ते केले आहे आणि माझा क्रोध भडकविला आहे.”


तुम्ही आम्हाला शेजार्‍यांच्या निंदेचा विषय केले आहे; ते आपसात आमचा उपहास करतात.


तुम्ही त्याच्या शत्रूचा उजवा हात उच्च केला आहे; आणि त्यांना हर्षित केले आहे.


प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांचा एक दिवस आहे दृष्टान्ताच्या खोऱ्यामध्ये गोंधळाचा, तुडविण्याचा आणि दहशतीचा, भिंती तोडून पाडण्याचा दिवस आणि पर्वतातून ओरडण्याचा दिवस आहे.


थोड्या काळाकरिता तुमच्या लोकांनी तुमच्या पवित्र भूमीचा ताबा घेतला, परंतु आता आमच्या शत्रूंनी तुमच्या पवित्रस्थानास तुडविले आहे.


माझा तंबू धुळीला मिळाला आहे; त्याच्या सर्व दोऱ्या तुटल्या आहेत. माझी मुले माझ्यापासून दूर गेली आहेत आणि नाहीशी झाली आहेत; माझा तंबू उभारण्यासाठी कोणीही राहिले नाही, माझे निवासस्थान पुन्हा बांधण्यास कोणीही नाही.


“मी माझ्या लोकांचा त्याग करेन, माझ्या वारसांचा परित्याग करेन; माझ्या अतिप्रियजनांना मी त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.


आणि यरुशलेममधील संदेष्ट्यात मी काही भयानक गोष्टी बघितल्या: ते व्यभिचार करतात आणि लबाडीत जीवन जगतात. ते दुष्कर्म्याचे बाहू मजबूत करतात, जेणेकरून दुष्टतेपासून कोणीही परावृत्त होत नाही. ते सर्व मला सदोमातील लोकांसारखे वाटतात; यरुशलेम येथील लोक गमोरातील लोकांसारखे वाटतात.”


मग गारद्यांचा सरदार नबुजरदान याने शहरात उरलेल्यांना, त्यांना पूर्वीच फितूर झालेल्या सर्वांना व शेष लोकांना बाबेलला बंदिवासात घेऊन गेला.


मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?” असे याहवेह विचारतात. “अशा राष्ट्राचा मी स्वतः सूड घेऊ नये का?


“याकारणास्तव मी रडत आहे आणि माझ्या डोळ्यातून अश्रुपात होत आहे. माझे सांत्वन करण्यास माझ्याजवळ कोणीही नाही, माझा आत्मा पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणीही नाही. माझी मुलेबाळे निराश्रित झाली आहेत. कारण शत्रूचे वर्चस्व झाले आहे.”


“याहवेह नीतिमान आहेत, तरीसुद्धा मी त्यांच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. सर्व लोकांनो, इकडे लक्ष द्या; माझ्या वेदना पाहा. कारण माझे तरुण व तरुणी बंदिवासात गेले आहेत.


कारण यरुशलेमेने भयंकर पापे केली म्हणूनच ती किळसवाणी झाली आहे. तिचा मान सन्मान करणारे आता तिला तुच्छ मानतात, कारण तिला विवस्त्र असे त्यांनी पाहिले आहे; ती कण्हते व वळून निघून जाते.


याहवेहने योजल्यानुसार केले आहे; त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे.


“सर्व शत्रूंनी आपले मुख आमच्याविरुद्ध खूप रुंद उघडले आहे.


म्हणून मी त्यांना दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही, आणि त्यांनी जे काही केले आहे ते मी त्यांच्याच डोक्यावर आणणार आहे.”


याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’


कारण मला माहीत आहे की, माझ्या मृत्यूनंतर तुम्ही स्वतःला पूर्णपणे भ्रष्ट कराल आणि मी दिलेल्या आज्ञांपासून बहकून दूर जाल. भविष्यकाळात तुमच्यावर संकटे येतील, कारण याहवेहच्या दृष्टीने वाईट ते कराल व तुमच्या हस्तकृतीने त्यांना अतिशय संतप्त कराल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan