Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 रात्रभर ती अत्यंत रडत असते; तिच्या गालांवरून अश्रू ओघळत आहेत. तिच्या सर्व प्रियकरात तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिचा विश्वासघात केला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 ती रात्री फार रडते व तिचे अश्रू तिच्या गालांवर असतात. तिच्या सर्व प्रियकरांमध्ये तिला दिलासा देणारा कोणी नव्हता. तिच्या सर्व मित्रांनी तिच्याशी विश्वासघात केला. ते तिचे शत्रू झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:2
30 Iomraidhean Croise  

माझे बंधुजन खंडित झालेल्या ओढ्याप्रमाणे, वाहून जाणार्‍या ओहोळाप्रमाणे दगा देणारे आहेत


त्याचप्रमाणे मला निष्‍फळतेचे महिने दिले गेलेले आहेत, कष्टाच्या रात्री माझ्यासाठी नेमलेल्या आहेत.


जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.


माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे शेजारी माझा तिरस्कार करतात आणि माझ्या जवळच्या मित्रांची मला भीती वाटते— जे मला रस्त्यावर पाहताच माझ्यापासून दूर पळून जातात.


माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.


अन्न म्हणून त्यांनी मला विष दिले, तहान भागविण्यासाठी त्यांनी मला आंब दिला.


गरीब माणसांचे सर्व नातेवाईक त्याला टाळतात— तर त्याचे मित्र त्याला किती बरे टाळतील! गरीब मनुष्य गयावया करून कितीही त्यांच्यामागे गेला तरी ते कुठेही सापडत नाहीत.


जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर मी एकांतात अश्रू ढाळेन तुमच्या गर्विष्ठपणामुळे; माझे डोळे घोर रुदन करतील, माझ्या अश्रूंचा पूर लोटेल, कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल.


तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको, आणि तुझ्या घशाला कोरड पडली आहे. परंतु तू म्हटले, ‘याचा काही उपयोग नाही! मी परकीय दैवतावर प्रेम करतो, आणि मी त्यांचेच अनुसरण करणार.’


“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.


तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; त्यांना तुझी चिंता नाही; एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे निर्दयागत मी तुला शासन केले, कारण तुझा अपराध फार मोठा आहे तुझी पातके पुष्कळ झाली आहेत.


हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे? कशासाठी तू ही गडद वस्त्रे परिधान केली आहेस आणि अंगावर सोन्याचे दागिने चढविले आहेस? आपल्या डोळ्यांत काजळ घालून ते सजविले आहेस? या सर्व शृंगारांचा तुला काही एक उपयोग होणार नाही. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात; तुला ठार करण्याची त्यांची इच्छा आहे.


हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता! तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता.


“मी माझ्या मित्रगणांना बोलाविले पण त्यांनी माझा विश्वासघात केला. माझे याजक आणि वडीलजन स्वतःस जिवंत ठेवण्यासाठी जेव्हा ते अन्नाचा शोध घेत होते तेव्हा ते नगरात नष्ट झाले.


“लोकांनी माझे कण्हणे ऐकले आहे, पण माझे सांत्वन करण्यास कोणीही नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझ्या संकटांबद्दल ऐकले आहे तुम्ही जे केले ते पाहून त्यांना आनंद झाला आहे; तुम्ही घोषणा केलेला दिवस येवो म्हणजे ते देखील माझ्यासारखेच होतील.


तिची अशुद्धता तिच्या वस्त्राला चिकटली आहे; तिने तिच्या भविष्याचा विचार केला नाही. तिचे पतन अचंबित करून सोडणारे होते; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे याहवेह, माझी दुर्दशा पाहा, शत्रू विजयी झाला आहे.”


माझे डोळे आता रडून थकले आहेत, मला आतून उत्कट यातना होत आहेत; माझे अंतःकरण जणू भूमीवर ओतले जात आहे कारण माझ्या लोकांचा सर्वनाश झाला आहे, कारण लहान मुले व तान्ही बाळे नगराच्या रस्त्यांवर मूर्छित होऊन पडत आहेत.


यामुळे ज्यांच्याठायी तुला सुख मिळाले त्या तुझ्या सर्व प्रियकरांना मी एकत्र करेन, ज्यांच्यावर तू प्रेम केले, तसेच ज्यांचा तू वीट केला. मी त्यांना चहूकडून तुझ्याविरुद्ध एकत्र करेन आणि त्यांच्यासमोर तुला नग्न करेन आणि ते तुझी पूर्ण नग्नता पाहतील.


ती तिच्या प्रियकरांमागे धावेल, पण त्यांना गाठू शकणार नाही. ती त्यांना शोधेल, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी आता माझ्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण माझी परिस्थिती सध्यापेक्षा तेव्हा चांगली होती.’


शेजाऱ्यावर भरवसा ठेवू नका; आणि मित्रांवर विश्वास ठेवू नका. तुझ्या मिठीत असलेली स्त्रीबरोबर असतानाही, तुझ्या ओठांच्या शब्दांचे रक्षण कर.


त्या सर्वांचा एकच उद्देश आहे, ते पशूला आपले सामर्थ्य व अधिकार बहाल करतील.


तो पशू व जी दहा शिंगे तू पाहिली, ते वेश्येचा द्वेष करतात; ते तिच्यावर हल्ला करतील आणि तिला नग्न करून तिचे मांस खातील व तिला अग्नीने जाळून टाकतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan