Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 अन्नाचा शोध घेत असताना तिचे लोक कण्हत आहेत; मौल्यवान वस्तूच्या मोबदल्यात ते अन्न विकत घेत आहेत जेणेकरून ते जिवंत राहतील. “हे याहवेह, पाहा आणि याकडे लक्ष द्या, मी कशी घृणास्पद झाले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तिचे सर्व लोक उसासे टाकत आहेत, अन्नान्न करीत आहेत, आपला प्राण वाचवण्यास त्यांनी भाकरीच्या मोबदल्यात आपल्या रम्य वस्तू दिल्या आहेत. “हे परमेश्वरा, लक्ष लावून पाहा, मी कशी तुच्छ झाले आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 यरूशलेमेमधील सर्व लोक कण्हत आहेत, ते अन्न शोधत आहेत. त्यांनी आपला जीव वाचावा म्हणून अन्नासाठी त्यांच्या जवळच्या मनोरम वस्तू दिल्या आहेत. “परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी कशी कवडीमोलाची झाली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:11
20 Iomraidhean Croise  

शोमरोन शहरात फार मोठा दुष्काळ पडला; वेढा इतका काळ राहिला की गाढवाचे मुंडके चांदीच्या ऐंशी शेकेलला आणि कबुतराची एक पावशेर विष्ठा पाच शेकेलला विकली गेली.


“मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.


आमच्या शेजार्‍यांसाठी व सभोवती असणार्‍यांसाठी, आम्ही तिरस्काराचे, तुच्छतेचे आणि उपहासाचे पात्र झालो आहोत.


म्हणून याहवेहने असे म्हणतात: “जर तू पश्चात्ताप करशील, तर मी तुला पुनर्स्थापित करेन म्हणजे तू माझी सेवा करशील; जर तू अयोग्य नव्हे, तर योग्य शब्द उच्चारशील, मग तू माझ्यावतीने बोलणारा होशील. या लोकांना तुझ्याकडे परत येऊ दे, परंतु तू त्यांच्याकडे वळू नको.


मी त्यांना त्यांच्या पुत्र आणि कन्यांचे मांस खाण्यास लावेन, आणि त्यांचे शत्रू त्यांच्या सभोवतीच्या वेढ्याने त्यांच्यावर एवढा दबाव आणतील की ते एक दुसऱ्याचे मांस खातील.’


“महाराज, माझे स्वामी, या माणसांनी यिर्मयाह संदेष्ट्याला अंधार विहिरीत टाकले, हे फार वाईट कृत्य केले आहे. तिथे तो उपासमारीने मरेल, कारण शहरातील सर्व भाकर संपली आहे.”


चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही.


कारण यरुशलेमेने भयंकर पापे केली म्हणूनच ती किळसवाणी झाली आहे. तिचा मान सन्मान करणारे आता तिला तुच्छ मानतात, कारण तिला विवस्त्र असे त्यांनी पाहिले आहे; ती कण्हते व वळून निघून जाते.


तिची अशुद्धता तिच्या वस्त्राला चिकटली आहे; तिने तिच्या भविष्याचा विचार केला नाही. तिचे पतन अचंबित करून सोडणारे होते; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे याहवेह, माझी दुर्दशा पाहा, शत्रू विजयी झाला आहे.”


माझे डोळे आता रडून थकले आहेत, मला आतून उत्कट यातना होत आहेत; माझे अंतःकरण जणू भूमीवर ओतले जात आहे कारण माझ्या लोकांचा सर्वनाश झाला आहे, कारण लहान मुले व तान्ही बाळे नगराच्या रस्त्यांवर मूर्छित होऊन पडत आहेत.


ते त्यांच्या मातांना विचारत आहेत, “द्राक्षारस व धान्य कुठे आहे?” ते नगराच्या रस्त्यांवर घायाळ झालेल्याप्रमाणे बेशुद्ध होऊन पडत आहेत, त्यांच्या मातांच्या बाहूत या मुलांचे प्राण हळूहळू निघून जात आहेत.


याहवेह, बघा व विचार करा: तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय?


हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा; आमच्या अपमानाकडे लक्ष द्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan