Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 एकेकाळी माणसांनी गजबजलेली ही नगरी, आता कशी निर्जन झाली आहे! एकेकाळी राष्ट्रांमध्ये जी सर्वोत्कृष्ट नगरी होती, तिला आता कसे वैधव्यच प्राप्त झाले आहे! एकेकाळची ही सर्व प्रांताची राणी आता कशी दासी झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हायहाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकान्तात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परगण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यरूशलेम नगरी जी लोकांनी भरलेली असे, आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे. जी राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे. राष्ट्रांमध्ये जी राजकुमारी होती, पण आता तिला दासी केले गेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 1:1
38 Iomraidhean Croise  

आणि फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि पुढे खाली इजिप्तच्या हद्दीपर्यंत या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते. या सर्व राष्ट्रांनी शलोमोनला कर दिला व शलोमोनच्या सर्व आयुष्यभर ते त्याच्या अधीन राहिले.


त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.


यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले.


फरात नदीपासून ते पलिष्टी लोकांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत असलेल्या सर्व राजांवर त्याने राज्य केले.


यरुशलेममध्ये असे बलवान राजे होते की त्यांनी फरात नदीच्या पलीकडील संपूर्ण प्रदेशात राज्य केले व त्यांना कर, खंडणी, नजराणे दिले जात असे.


आणखी दुसरे काही म्हणाले, “आमची शेते आणि द्राक्षमळे यावरील राजाचा कर भरता यावा म्हणून आम्हाला कर्जाऊ पैसे काढावे लागले आहेत.


आमच्या पापांमुळे, या देशाचे विपुल उत्पन्न, आमच्यावर राज्य करणाऱ्या राजांकडे जात आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे ते आमच्या शरीरावर व आमच्या पशूंवर सत्ता करतात. खरोखर आम्ही घोर दैन्यावस्थेत आहोत.


हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे— याहवेहची कुळे— याहवेहची उपकारस्तुती करण्यास येथे जमत आहेत.


पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा! तू स्वर्गातून कसा पडला आहेस, तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले, तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस!


हे गोंधळाने भरलेल्या नगरा, हे दंगा व चंगळबाजीने भरलेल्या शहरा, तुमचे वधलेले लोक तलवारीने मारले गेले नव्हते, ते युद्धातही मरण पावले नव्हते.


सीयोनच्या वेशी आक्रोश करतील आणि विलाप करतील; ती निराधार होऊन जमिनीवर बसलेली असेल.


तेव्हा तू मनात म्हणशील, ‘यांना माझ्यासाठी कोणी जन्माला घातले? मी दुःखी व निर्वंश होते; मी बंदिवासात व नाकारलेली होते. माझ्यासाठी यांना कोणी वाढविले? मला एकटेच टाकण्यात आले होते, मग हे सर्व—कुठून आले?’ ”


सार्वभौम याहवेहनी माझे कान उघडले आहेत; मी बंडखोर नव्हतो, मी मागे फिरलो नाही.


हे यरुशलेमे, तुझ्यावरील धूळ झटकून टाक, ऊठ व सिंहासनारुढ हो. बंदिवान सीयोनकन्ये, दास्यतेची बंधने आपल्या गळ्यांतून काढून मुक्त हो.


पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत, जे आनंददायी वार्ता आणतात, जे शांतीची घोषणा करतात, जे शुभ संदेश आणतात, जे तारणाची घोषणा करतात, जे सीयोनास म्हणतात, “तुमचे परमेश्वर राज्य करतात!”


“भयभीत होऊ नको; तुला लज्जित व्हावे लागणार नाही. अप्रतिष्ठेला घाबरू नको; तुला अपमानित व्हावे लागणार नाही. तुझ्या तारुण्यातील लज्जा तू विसरून जाशील आणि वैधव्यातील दुःखांची तुला आठवणही राहणार नाही.


याहवेह असे म्हणतात: “याकोबासाठी हर्षाने गाणी गा; सर्वश्रेष्ठ इस्राएली राष्ट्रासाठी गर्जना करा. तुमचे स्तुतिगान जाहीरपणे ऐकू यावे आणि म्हणा, ‘याहवेह, आपल्या लोकांचे, इस्राएलाच्या अवशेषाचे तारण करा’


शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याने त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांची सेवा करण्यास भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, आणि तुमचे बरे होईल.


यिर्मयाह संदेष्ट्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही सर्व उरलेल्या लोकांसाठी याहवेह, तुझे परमेश्वर यांची प्रार्थना कर. कारण आम्ही पूर्वी पुष्कळ होतो, आता फारच थोडे उरलो आहोत, हे तू पाहतोस.


“सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: यरुशलेम व यहूदीयाची सर्व नगरे यांच्यावर मी कसा विनाश आणला, ते तुम्ही पाहिले आहे. ते आता टाकलेल्या लोकागत भग्नावशेषात निवास करतात,


यामुळे माझा क्रोधाग्नी उफाळून आला; त्याचा यहूदीयातील नगरांवर, यरुशलेमच्या रस्त्यावर वर्षाव झाला. त्याने ती नगरे ओसाड केली, जसे ते आजही आहेत.


कसा मोडणारा व चुराडा करणारा संपूर्ण पृथ्वीतलावरील अत्यंत जबरदस्त असा हा हातोडा! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड बनले आहे!


“मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन, आणि त्यात कोल्ह्यांची विवरे होतील. यहूदीयातील नगरे उजाड करेन तिथे कोणीही वस्ती करू शकणार नाही.”


“मी माझ्या मित्रगणांना बोलाविले पण त्यांनी माझा विश्वासघात केला. माझे याजक आणि वडीलजन स्वतःस जिवंत ठेवण्यासाठी जेव्हा ते अन्नाचा शोध घेत होते तेव्हा ते नगरात नष्ट झाले.


प्रभूने सीयोनकन्येला आपल्या क्रोधरूपी मेघाने कसे आच्छादून टाकले आहे! त्यांनी इस्राएलचे वैभव स्वर्गातून पृथ्वीवर खाली धुळीत फेकले आहे; क्रोधाच्या दिवशी त्यांनी आपल्या पादासनाचेही स्मरण केले नाही.


सीयोनकन्येचे वडीलजन मूकपणे जमिनीवर बसले आहेत; त्यांनी मस्तकांवर धूळ शिंपडून घेतली आहे आणि त्यांनी गोणपाट नेसले आहे. यरुशलेमच्या तरुणींनी माना खाली घातल्या आहेत.


सोन्याची चमक कशी नाहीशी झाली आहे, उत्तम सोने निस्तेज झाले आहे! पवित्र रत्ने प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात विखुरली आहेत.


आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे. धिक्कार असो आमचा, कारण आम्ही पाप केले आहे!


तेव्हा सर्व समुद्रतटाचे राजकुमार आपआपल्या राजासनांवरून खाली उतरतील आणि आपले झगे काढून बाजूला ठेवतील व आपली नक्षीदार वस्त्रे काढून टाकतील. भीतीची वस्त्रे घालून, प्रत्येक क्षणी थरथर कापत, तुझ्याविषयी भयभीत होऊन ते जमिनीवर बसतील.


“मानवपुत्रा, यरुशलेमविषयी सोरने म्हटले, ‘आहा! राष्ट्रांचे प्रवेशद्वार मोडले आहे आणि त्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडे पडले आहेत; ती उजाड झाली आहे, तर आता माझी भरभराट होईल,’


“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेम आहे, ज्याला मी सर्व राष्ट्रांच्या मधोमध स्थापित केले, आणि तिच्याभोवती सर्व राष्ट्रे ठेवली.


तसेच मी तुमची शहरे उजाड करेन, तुमची पवित्रस्थाने ओसाड करेन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा सुवास घेणार नाही.


मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.


ही नगरी चैनबाजी करणारी, सुरक्षितेत वसणारी होती. ती स्वतःशी म्हणत असे, “मी एकटीच आहे, माझ्यासारखी नगरी जगात दुसरी नाही.” पण आता तिची कशी भग्नावस्था झाली आहे, जंगली श्वापदे राहण्याचे ठिकाण! तिच्याजवळून जाणारे सर्वजण तिचा उपहास करून त्यांचे डोके हलवितात.


तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. मी काही विधवा नाही. मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan