यहोशवा 9:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांनी उत्तर दिले, “तुमचे दास एका अतिशय दूर देशाहून आले आहेत, कारण आम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची किर्ती आणि इजिप्तमध्ये त्यांनी तुमच्यासाठी जे सर्व केले त्याबद्दल ऐकले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यांनी त्याला म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत; त्याची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यांनी त्यास म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून आम्ही तुझे दास फार दूर देशाहून आलो आहोत. कारण त्याने मिसरात जी प्रत्येक गोष्ट केली त्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे; Faic an caibideil |
“मी तिथे त्यांच्यामध्ये एक चिन्ह पाठवेन आणि त्यातून जे राष्ट्रांतील अवशिष्ट आहेत, त्यांना मी—तार्शीश, पूल, लूद (धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध असलेले), तूबाल, यावान या देशांमध्ये व दूरवर असलेल्या द्वीपांवर, जिथे कुठेही माझी किर्ती ज्यांच्या कानी पडली नाही व माझे गौरव ज्यांनी पाहिले नाही, अशा ठिकाणी त्यांना पाठवेन. त्या देशांमध्ये ते माझ्या गौरवाची घोषणा करतील.
तेव्हा त्यांनी यहोशुआला उत्तर दिले, “कारण आम्हाला असे सांगण्यात आले होते की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी आपला सेवक मोशेला हा संपूर्ण प्रदेश जिंकून घेण्याची आणि त्यात राहणार्या सर्व लोकांना नष्ट करण्याची आज्ञा दिली होती. म्हणून तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जिवाबद्दल भीती वाटू लागली; म्हणूनच आम्ही हे केले.