Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 9:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तरीपण जेव्हा गिबोनाच्या लोकांनी ऐकले की यहोशुआने यरीहो आणि आय या शहरांचे काय केले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 यहोशवाने यरीहो आणि आय या नगरांचे काय केले हे जेव्हा गिबोनाच्या रहिवाश्यांनी ऐकले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 9:3
17 Iomraidhean Croise  

नेरचा पुत्र अबनेर शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्या माणसांबरोबर एकत्र येऊन महनाईम सोडून गिबोनकडे गेले.


इश्मायाह हा गिबोनी होता. हा तीस वीरांतील अत्यंत शूरवीर असून त्या तिसांवरील मुख्य होता. यिर्मयाह, यहजिएल, योहानान, गदेराथी योजाबाद,


शलोमोन व संपूर्ण सभा गिबोनच्या उच्चस्थानी गेले, कारण याहवेहचा सेवक मोशेने अरण्यवासात परमेश्वराचा सभामंडप उभारला होता.


त्याच वर्षी, म्हणजे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी म्हणजे चौथ्या वर्षातील पाचव्या महिन्यात, गिबोन येथील अज्जूरचा पुत्र हनन्याह नावाचा जो संदेष्टा होता, तो याजक व सर्व लोकांच्या समक्ष मला उद्देशून याहवेहच्या भवनात जाहीरपणे म्हणाला:


यरीहो येथे यहोशुआने जे केले, तसेच आय शहरात करून त्याने ते कसे हस्तगत केले, त्याचा कसा नाश केला, त्याच्या राजांचा कसा वध केला, गिबोनाच्या लोकांनी इस्राएली लोकांशी शांतीचा करार कसा केला आणि आता ते इस्राएलचे मित्र राष्ट्र म्हणून कसे बनून राहिले, या सर्व गोष्टी यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेक याने ऐकल्या,


तेव्हा तो व त्याचे लोक अतिशय घाबरून गेले. कारण गिबोन हे एका राजेशाही शहराप्रमाणे प्रतिष्ठित शहर होते; ते आय नगरापेक्षा मोठे होते व त्यातील पुरुष उत्तम योद्धे होते.


त्याच दिवशी यहोशुआने मक्केदा या शहराचा नाश केला आणि त्या शहराचा राजा व त्यातील प्रत्येकाचा तलवारीने संहार केला. एकही व्यक्ती जिवंत ठेवण्यात आली नाही. त्याने यरीहोच्या राजाचे केले तसेच मक्केदाच्या राजाचेही केले.


याहवेहने ते शहर आणि त्याच्या राजालाही इस्राएलच्या हाती दिले. ते शहर आणि त्यातील प्रत्येकाचा यहोशुआने तलवारीने नाश केला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही आणि यरीहोच्या राजाचे जसे केले तसे त्याने तेथील राजांचे केले.


गिबोनातील हिव्वी लोकांशिवाय कोणत्याही शहराने इस्राएली लोकांशी शांतीचा करार केला नाही; इस्राएली लोकांनी बाकीच्या सर्वांना लढाईत जिंकून घेतले.


गिबोन, रामाह, बैरोथ,


बिन्यामीनच्या गोत्राकडून त्यांना: गिबोन, गेबा,


तेव्हा इस्राएली लोक बाहेर पडले आणि तिसर्‍या दिवशी ते त्यांच्या शहरांकडे आले: गिबोन, कफीराह, बैरोथ आणि किर्याथ-यआरीम ही त्या शहरांची नावे.


नंतर यहोशुआने गिबोनी लोकांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारले, “आम्ही दूरच्या देशात राहतो असे सांगून तुम्ही आमची फसवणूक का केली? खरे पाहिले तर तुम्ही आमच्या जवळच राहता.


तेव्हा त्यांनी एका युक्तीचे अवलंबन केले: ते यहोशुआकडे प्रतिनिधी म्हणून गेले, गाढवांवर जुनी गोणपाटे आणि झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan