Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 9:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 आता आम्ही सर्वस्वी तुमच्या हाती आहोत. तुम्हाला चांगले व योग्य वाटेल त्याप्रमाणे आमचे करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 आता आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 आता पाहा, आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 9:25
12 Iomraidhean Croise  

यावर अब्रामाने सारायला उत्तर दिले, “तुझ्या दासीवर तुझा पूर्ण अधिकार आहे. तुला जे योग्य वाटेल ते तिच्याशी कर.” तेव्हा सारायने हागारची छळणूक केली; आणि हागार तिच्यापासून पळून गेली.


परंतु जर याहवेहने म्हटले, ‘मी तुझ्यावर प्रसन्न नाही,’ तर मी तयार आहे; त्यांना जे बरे वाटते तसे याहवेह माझे करो.”


दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात आहे. आपण याहवेहच्या हाती पडू, कारण त्यांची कृपा अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.”


मग राजवाड्याचा कारभारी, शहराचा कारभारी, वडील व त्या पुत्रांचे पालक यांनी येहूला हा निरोप पाठविला: “आम्ही तुमचे सेवक आहोत व तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा म्हणून नियुक्त करणार नाही; तुम्हाला जे उत्तम वाटते, ते तुम्ही करा.”


मी माझ्या लोकांवर संतापलो होतो आणि माझ्या वारसांना भ्रष्ट केले; त्यांना तुझ्या हाती दिले, पण तू त्यांना थोडीसुध्दा दया दाखविली नाहीस. वयस्कर लोकांवरही तू अवघड ओझे लादलेस.


माझ्याबाबतीत म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुमच्यामते जे योग्य व वाजवी आहे ते येईल माझे करा.


यावर सिद्कीयाह राजा म्हणाला, “तो तुमच्या हातात आहे. राजा तुमच्या विरोधात काही करू शकत नाही.”


कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.


तेव्हा यहोशुआने त्यांना इस्राएली लोकांपासून वाचविले व त्यांना जिवे मारू दिले नाही.


परंतु इस्राएली लोकांनी याहवेहला म्हटले, “आम्ही पाप केले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण आता आम्हाला सोडवा.”


मग गिदोन आला आणि सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “यांना पाहा हे जेबह राजा व सलमुन्ना यांच्याविषयी तुम्ही मला टोमणा मारत म्हटले होते, ‘आता तुझ्या हातात ओरेब व जेबाचे हात आहेत काय? मग आम्ही तुझ्या थकलेल्या सैन्याला भाकरी का द्यावी?’ ”


तेव्हा शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काहीही लपवून ठेवले नाही. तेव्हा एली म्हणाला, “ते याहवेह आहेत; त्यांच्या दृष्टीने जे बरे ते करो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan