Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 9:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व राजांनी—डोंगराळ प्रदेशाच्या राजांनी, पश्चिमी पर्वत पायथ्यावरील राजांनी आणि लबानोन पर्यंत असलेल्या भूमध्य समुद्रकिनार्‍यांवरील सर्व राजांनी (हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी राजांनी) या गोष्टींबद्दल ऐकले

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे ऐकून यार्देनेच्या पश्‍चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनार्‍यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांचे सर्व राजे

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग यार्देन नदीच्या पश्चिमी डोंगराळ प्रदेशात, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या किनाऱ्यावर राहणारे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांचे जे सर्व राजे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 9:1
32 Iomraidhean Croise  

नंतर ते सोरच्या किल्ल्याकडे आणि हिव्वी व कनानी यांच्या सर्व नगरांकडे व शेवटी ते यहूदीयाच्या नेगेवप्रांतातील बेअर-शेबापर्यंत गेले.


माझा दूत तुमच्यापुढे जाईल आणि तुम्हाला अमोरी, हिथी, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात पोहचवेल आणि मी त्या सर्वांचा नाश करेन.


“तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत व वाळवंटापासून फरात नदीपर्यंत मी तुमची सीमा स्थापित करेन. त्या देशात राहणारे लोक मी तुमच्या हाती देईन आणि तुम्ही त्यांना आपल्या पुढून घालवून टाकाल.


आणि इजिप्तमधील तुमच्या या दुःखातून तुम्हाला बाहेर काढून कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोक राहत असलेल्या दूध व मध वाहत्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याचे मी वचन दिलेले आहे.


मी तुला आज जे आज्ञापितो ते तू पाळावे. मी तुमच्यापुढून अमोरी, कनानी, हिथी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांना घालवून देईन.


नेगेवमध्ये अमालेकी लोक राहतात. डोंगराळ प्रदेशात हिथी, यबूसी आणि अमोरी लोक राहतात. समुद्राच्या किनार्‍यावर आणि यार्देन नदीच्या खोर्‍यात कनानी लोक राहतात.”


तुमची पश्चिमेकडील सीमा भूमध्य समुद्राचा किनारा असेल. ही तुमची पश्चिम सीमा असावी.


आता तुम्ही येथून जा व अमोर्‍यांचा डोंगराळ प्रदेश, अराबाची दरी, नेगेव, कनान व लबानोन आणि भूमध्य समुद्रकिनार्‍यापासून ते फरात नदीच्या काठापर्यंत पसरलेल्या संपूर्ण प्रदेशात जाऊन वस्ती करा.


हे प्रभो, मला जाऊ द्या आणि यार्देनच्या पलीकडील उत्तम जमीन पाहू द्या—तो उत्तम डोंगराळ प्रदेश आणि लबानोन.”


आणि तसेच यार्देनच्या पूर्वेस असलेल्या अराबाच्या संपूर्ण प्रदेशापासून पिसगा पर्वताच्या उताराखाली असलेल्या खार्‍या समुद्रापर्यंतचा सर्व भूभाग इस्राएली लोकांनी जिंकून घेतला.


जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला त्या देशात घेऊन जातील, ज्याचा ताबा मिळविण्यासाठी तुम्ही जात आहात आणि तुमच्यापुढून—हिथी, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य सात राष्ट्रांना हाकलून देतील—


याहवेहने जशी तुम्हाला विश्रांती दिली आहे तशीच त्यांनाही देईपर्यंत आणि याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना जो प्रदेश देत आहेत, त्याचा ताबा घेईपर्यंत तुम्ही त्यांची मदत करावी. त्यानंतर तुम्ही परत जाऊ शकता आणि जो यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश याहवेहचा सेवक मोशेने तुम्हास दिला आहे, त्या स्वतःच्या प्रदेशात तुम्ही वास्तव्य करू शकता.”


तुमची सीमा वाळवंटापासून लबानोन पर्यंत आणि महान नदी फरातपासून, सर्व हिथी देश, ते पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत असेल.


मग त्या गुहेतून पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश आणि एग्लोन या नगरांच्या राजांना बाहेर काढण्यात आले.


सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी लबानोनाच्या खोर्‍यात असलेल्या बआल-गादपर्यंतचा सर्व प्रदेश. त्यांच्या सर्व राजांना त्याने हस्तगत केले व त्यांना जिवे मारले.


गिबली लोकांचा प्रदेश; बआल-गादपासून खाली हर्मोन पर्वत ते लेबो हमाथपर्यंत पूर्वेकडील सर्व लबानोन.


भूमध्य समुद्राचा किनारा ही पश्चिमेची सीमा होती. यहूदाह कुळातील लोकांच्या त्यांच्या वंशानुसार हा प्रदेश मिळाला.


आता याहवेह तुमच्या परमेश्वरांनी अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांना विसावा दिला आहे. तर आता यार्देनेच्या पलीकडे याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या प्रदेशातील तुमच्या घरी तुम्ही परत जा.


(मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला मोशेने बाशान प्रदेशात वतन दिले होते, तर यहोशुआने त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या गोत्राला त्यांच्या सहइस्राएली लोकांबरोबर यार्देनेच्या पश्चिमेस वतन दिले होते.) जेव्हा यहोशुआने त्यांना घरी पाठवले, तेव्हा त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि तो म्हणाला,


आठवण करा, कशाप्रकारे यार्देनपासून पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत या उर्वरित राष्ट्रांना मी जिंकले व ती तुमच्या गोत्रांना तुमचे वतन म्हणून वाटून दिले.


“ ‘नंतर तुम्ही यार्देन नदी ओलांडून यरीहोकडे आला. यरीहोचे रहिवासी तुमच्याविरुद्ध लढले, तसेच अमोरी, परिज्जी, कनानी, हिथी, गिर्गाशी, हिव्वी आणि यबूसी हे सुद्धा लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले.


यहोशुआ म्हणाला, अशाप्रकारे तुम्हाला कळेल की जिवंत परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत व कनानी, हिथी, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसींना ते खचितच तुमच्या समोरून घालवून देतील.


सर्व इस्राएली लोकांच्या संपूर्ण राष्ट्राने कोरड्या जमिनीवरून पलीकडे जाईपर्यंत, याहवेहचा कराराचा कोश वाहून नेणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी थांबले आणि कोरड्या जमिनीवर उभे राहिले.


आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्‍यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही.


याप्रमाणे याहवेह यहोशुआबरोबर होते आणि त्याच्या नावाची सर्वत्र किर्ती पसरली.


तेव्हा इस्राएली लोकांनी या हिव्वी लोकांस उत्तर दिले, “परंतु कदाचित तुम्ही आमच्या जवळपास राहत असाल, तेव्हा आम्ही तुमच्याशी शांतीचा करार कसा करू शकतो?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan