तेव्हा राजा रात्री उठला आणि आपल्या सेवकांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो की अरामी लोकांनी आपल्यासोबत काय केले आहे. आपण भुकेने मरत आहोत हे त्यांना माहीत आहे; म्हणून ते आपली छावणी सोडून आजूबाजूला मैदानात दबा धरून बसले आहे. त्यांना वाटते की, ‘ते खात्रीने बाहेर पडतील आणि मग आपण त्यांना जिवंत पकडू आणि त्यांच्या शहरात प्रवेश करू.’ ”