Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 7:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 आणि आखानावर दगडांची एक मोठी रास केली, जी आज देखील तिथे आहे. तेव्हा याहवेहचा कोप शांत झाला आणि तेव्हापासून त्या ठिकाणाला अखोरचे खोरे असे म्हटले जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. ह्यावरून त्या स्थळाला आजवर आखोर (त्रास देणारी) खिंड म्हणत आले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली; ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला राग शांत झाला. यावरुन त्या स्थळाला आजपर्यंत अखोरचे खोरे असे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 7:26
22 Iomraidhean Croise  

त्यांनी अबशालोमला घेऊन, जंगलात एका खड्ड्यात फेकून टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली, त्या दरम्यान सर्व इस्राएली लोक आपआपल्या घरी पळून गेले.


त्यांनी बिन्यामीन प्रांतातील सेला येथे शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी, शौलाचा पिता कीश याच्या कबरेत पुरल्या आणि राजाने आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही केले, त्यानंतर देशाच्या वतीने केलेल्या प्रार्थनेचे परमेश्वराने उत्तर दिले.


आता मी या उद्देशाने इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्याशी एक करार करतो की, जेणेकरून त्यांचा भयंकर क्रोध आपल्यापासून दूर होईल.


आमच्या पुढार्‍यांना न्यायदानाची व्यवस्था करू द्या. ज्याला गैरयहूदी पत्नी आहे असा प्रत्येकजण ठरलेल्या वेळी आपल्या नगराचे वडीलजन व न्यायाधीश यांच्यासह येईल. मग परिस्थिती निवळेल आणि आपल्या परमेश्वराचा भयंकर कोप आम्हांपासून दूर होईल.”


हे परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या, आम्हाला पुनर्स्थापित करा. आमच्याविरुद्ध तुमचा क्रोध पुन्हा भडकू देऊ नका.


इजिप्तच्या लोकांनी असे का म्हणावे की, याहवेहने त्यांना डोंगरात मारून टाकावे व या पृथ्वीतून नाहीसे करावे अशा दुष्ट हेतूने बाहेर काढले? आपल्या तीव्र कोपापासून माघार घ्या; सौम्य व्हा आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणू नका.


यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, आणि तिला असे घोषित करा की, तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, तिच्या पापाची परतफेड झाली आहे, याहवेहच्या हातातून तिला तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.


माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल.


त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर दगडमार केला;


तिथे मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आणि अखोरचे खोरे तिला आशेचे द्वार असे देईन. जेव्हा ती इजिप्तमधून बाहेर आली, तिच्या तारुण्याच्या दिवसात जसे उत्तर देत होती तसेच उत्तर देईल.


मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन; यापुढे त्यांची नावे कधीही घेतली जाणार नाही.


तुमची वस्त्रे फाडून नव्हे, तर तुमचे अंतःकरण फाडा. याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या, कारण ते कृपाळू व दयाळू आहेत. ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत, आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.


मग याहवेहने आपल्या देशासाठी ईर्ष्या धरली, आणि ते आपल्या लोकांवर दया करतील.


मग त्यांनी योनाहला उचलले आणि जहाजावरून समुद्रात फेकून दिले, आणि उग्र समुद्र तत्काळ शांत झाला!


मग त्याने मला बोलाविले आणि तो मला म्हणाला, “जे उत्तरेला गेले, त्यांनी उत्तरेकडील भूमीला माझ्या आत्म्याची शांती दिली आहे.”


आणि त्यांच्यामागे तंबूत गेला व त्या दोघांच्या म्हणजेच तो इस्राएली पुरुष व ती स्त्री यांच्या पोटात तो भाला भोसकला, तेव्हा इस्राएलच्या लोकांमधून पीडा थांबली;


आणि निषिद्ध वस्तूंपैकी ज्या विनाशासाठी ठरविलेल्या आहेत त्यातील काहीही तुमच्या हातात राहू नये. मग याहवेहचा तीव्र क्रोध शमेल, ते तुमच्यावर दया करतील आणि तुम्हावर करुणा करतील. तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे ते तुम्हाला बहुगुणित करतील—


कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची वाणी ऐकून, आज मी तुम्हाला ज्या आज्ञा देत आहे त्या पाळल्या आणि त्यांच्या दृष्टीने जे योग्य तेच केले आहे.


सूर्य मावळू लागला, तेव्हा यहोशुआने आज्ञा दिली की त्या राजांचे मृतदेह झाडांवरून खाली काढा आणि ते ज्या गुहेमध्ये लपून राहिले होते त्या गुहेत ती फेकून द्या. हे केल्यावर गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठ्या खडकांची रास रचून ठेवली. आजपर्यंत ती रास तिथेच आहे.


मग यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी जेरहाचा पुत्र आखान व त्याच्याबरोबर, ती चांदी, तो झगा, ती सोन्याची लगड, त्याचे पुत्र, त्याच्या कन्या, त्याचे बैल, गाढवे, मेंढरे, त्याचा तंबू आणि त्याचे जे काही होते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले.


यहोशुआने आय शहराच्या राजाचे शव एका झाडाला टांगून ठेवले आणि संध्याकाळपर्यंत ते तसेच सोडून दिले. सूर्यास्ताच्या वेळेस यहोशुआने त्यांना हुकूम केला की, त्याचे शरीर झाडावरून काढा आणि ते खाली नगरवेशीच्या प्रवेशमार्गात फेकून द्यावे. नंतर त्यांनी त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास रचून ठेवली, ती आजपर्यंत राहिली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan