Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 7:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मग यहोशुआ आखानाला म्हणाला, “तू आमच्यावर अरिष्ट का आणलेस? आता याहवेह तुझ्यावर अरिष्ट आणतील.” मग इस्राएल लोकांनी त्याला धोंडमार केली व त्याच्या बरोबरच्या इतरांनाही धोंडमार केल्यावर त्यांनी त्यांना जाळून टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्यास दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 7:25
23 Iomraidhean Croise  

तेव्हा याकोब, शिमओन व लेवी यांना म्हणाला, “या भूमीतील सर्व कनानी व परिज्जी लोकांना माझी किळस येईल असे वर्तन तुम्ही केले आहे. आपण अगदी थोडके आहोत; ते आपल्यावर चालून येतील आणि आपल्याला चिरडून टाकतील व आपण सर्वजण मारले जाऊ.”


सुमारे तीन महिन्यानंतर, “तुझी सून तामार ही वेश्याकर्मामुळे गर्भवती झाली आहे,” अशी बातमी यहूदाहच्या कानावर गेली. यहूदाह म्हणाला, “तिला बाहेर काढा आणि जाळून टाका!”


कर्मीचा पुत्र: आखार, ज्याने अविश्वासूपणे मूर्तीस समर्पित वस्तूंची चोरी करून आपल्या इस्राएली राष्ट्रास क्लेश दिला.


गैरमार्गाने प्राप्त केलेल्या मिळकतीचा जे लोभ धरतात, त्या सर्वांचे हे मार्ग आहेत; असे मिळविलेले धन, ते ज्यांच्या मालकीचे आहे त्यांचाच प्राण घेते.


लोभी माणसे त्यांच्या परिवारांवर विनाश आणतात, परंतु जो लाच घेणे घृणित मानतो, तो जगेल.


“ ‘एखाद्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करून तिच्या आईबरोबरही विवाह केला, तर ती भयंकर दुष्टता आहे. तुमच्यातील ही दुष्टता निपटून काढण्यासाठी त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रियांना अग्नीत जाळून टाकावे.


“इस्राएली लोकांना सांग: इस्राएली लोकांपैकी कोणीही किंवा तुमच्यात राहणाऱ्या कोणत्याही परदेश्याने त्याच्या मुलाचे अर्पण मोलख दैवतासाठी केले, तर समुदायातील सभासदांनी त्याला दगडमार करावा.


“ ‘एखाद्या याजकाची कन्या वेश्याकर्म करून स्वतःला भ्रष्ट करते तर ती आपल्या पित्याला अशुद्ध करते, म्हणून तिला अग्नीत जाळून टाकावे.


“परमेश्वराच्या नावाची निंदा करणार्‍याला छावणीच्या बाहेर घेऊन जा. ज्यांनी हे बोलताना ऐकले आहे, त्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा.


जे तुम्हाला हैराण करणारे आहेत, त्यांनी स्वतःला पूर्णरीतीने नपुंसक करून घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे.


त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी, कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वरापासून तुम्हाला फूस लावून दूर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.


तेव्हा संपूर्ण इस्राएल ऐकेल व भयभीत होईल आणि तुमच्यामध्ये असा दुष्टपणा करण्यास कोणी धजणार नाही.


ही घृणास्पद गोष्ट करणार्‍या त्या पुरुषाला अथवा स्त्रीला नगराच्या वेशीजवळ घेऊन जावे आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत धोंडमार करावा.


मग त्या नगरातील सर्व लोकांनी त्याला धोंडमार करून ठार मारावे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष तुम्ही घालवून टाकावे म्हणजे सर्व इस्राएली लोक हे ऐकतील आणि घाबरतील.


परमेश्वर न्यायी आहेत: जे तुम्हाला त्रास देतात त्यांची परतफेड ते त्रासांनी करतील.


परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा.


परंतु अर्पण केलेल्या सर्व वस्तूंपासून दूर राहा, म्हणजे त्यातील काहीही घेतल्याने तुम्ही स्वतःवर नाश ओढवून घेणार नाही. नाहीतर तुम्ही इस्राएलच्या छावणीच्या नाशासाठी जबाबदार ठराल आणि तिच्यावर संकट आणाल. प्रत्येक वस्तूचा तुम्ही नाश केला नाही, तर संपूर्ण इस्राएली राष्ट्रावर अनर्थ कोसळेल.


जो कोणी समर्पित केलेल्या वस्तूसह सापडेल त्याला, त्याच्याकडे असलेल्या सर्व वस्तूसह जाळून टाकावे. त्याने याहवेहचा करार मोडला आहे आणि इस्राएलमध्ये घृणास्पद कृत्य केले आहे.”


योनाथान म्हणाला, “माझ्या पित्याने देशावर कष्ट आणले आहे. हे थोडे मध चाखून माझे डोळे पाहा किती टवटवीत झाले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan