Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 7:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जो कोणी समर्पित केलेल्या वस्तूसह सापडेल त्याला, त्याच्याकडे असलेल्या सर्व वस्तूसह जाळून टाकावे. त्याने याहवेहचा करार मोडला आहे आणि इस्राएलमध्ये घृणास्पद कृत्य केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूर्खपणा केला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्यास त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून त्याचा नाश करावा. कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूढपणाचे काम केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 7:15
11 Iomraidhean Croise  

तेवढ्यात याकोबाचे पुत्रही रानातून घरी आले. शेखेमने इस्राएलात अशी भयानक गोष्ट करून याकोबाच्या कन्येला भ्रष्ट केल्याचे वृत ऐकून त्यांना मोठा धक्का बसला आणि ते संतप्त झाले कारण ही अपमानजनक गोष्ट घडणे अत्यंत घृणास्पद होते.


माझ्याबद्दल विचार कर, मी या बेअब्रू पासून कशी वाचेन? आणि तुझ्याबद्दल काय? इस्राएलमधील मूर्ख व दुष्टासारखा तू होशील? म्हणून कृपा करून राजाकडे बोलणे कर; ते मला तुझ्याशी लग्न करण्यापासून थांबविणार नाहीत.”


इस्राएलने पाप केले आहे; त्यांनी माझा करार भंग केला आहे, ज्याचे पालन करण्यास मी त्यांना सांगितले होते. समर्पित केलेल्या वस्तू ते घेऊन आले आहेत; त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी लबाडी केली आहे, त्यांनी त्या वस्तू स्वतःच्या मालकीच्या केल्या आहेत.


दुसर्‍या दिवशी सकाळ होताच यहोशुआने इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार पुढे बोलाविले आणि यहूदाहचे गोत्र निवडण्यात आले.


आपण इस्राएलाच्या सर्व गोत्रांतून शंभरातून दहा आणि हजारातून शंभर आणि दहा हजारातून एक हजार पुरुष निवडू आणि हे सैन्याकरिता भोजनसामुग्री आणतील. जेव्हा ते सैन्य बिन्यामीनच्या गेबा येथे पोहोचेल, तेव्हा इस्राएलात त्यांनी केलेल्या भयंकर घृणास्पद कृत्याबद्दल शिक्षा करेल.”


रात्रीच्या वेळेस गिबियाहतील लोक माझ्यामागे आले आणि घरास वेढा घातला व माझा घात करण्याचा त्यांचा बेत होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली.


तेव्हा मी उपपत्नीला घेतले आणि तिच्या शरीराचे कापून बारा तुकडे केले व ते इस्राएलांच्या वारसांच्या सर्व प्रांतात पाठवून दिले, कारण इस्राएलात त्यांनी हे अपवित्र आणि घृणास्पद कृत्य केले.


तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. दावीदा, माझ्या पुत्रा, परत ये. कारण आज तू माझ्या जिवास मौल्यवान समजलेस, मी पुन्हा तुला इजा करणार नाही. खरोखरच मी मूर्खासारखा वागलो आणि फार चुकीचे वागलो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan