यहोशवा 5:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून जी मुले आपल्या वडिलांची जागा घेण्यायोग्य झाली होती, यहोशुआने त्यांची सुंता केली. ते अजूनही बेसुंती होते कारण वाटेत त्यांची सुंता झाली नव्हती Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांच्या जागी त्यांची जी मुले त्याने वाढवली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ती बेसुनतच राहिली होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांच्या जागी त्यांची जी मुले देवाने वाढविली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ते बेसुनत राहिले होते. Faic an caibideil |
इस्राएली लोक चाळीस वर्षे संपेपर्यत रानात भ्रमण करीत राहिले होते. इजिप्त सोडताना जे पुरुष युद्ध करण्याच्या वयाचे होते, ते सर्वजण याकाळात मरण पावले होते, कारण त्यांनी याहवेहची आज्ञा पाळली नव्हती. याहवेहनी त्यांना शपथपूर्वक सांगितले होते की, जो देश इस्राएलला देण्याचे वचन मी त्यांच्या पूर्वजास दिलेले होते त्या “दुधामधाचे प्रवाह वाहणार्या” देशात, मी त्यांना प्रवेश करू देणार नाही.