Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 यरीहोच्या मैदानावर गिलगाल येथे इस्राएली लोकांनी तळ दिलेला असताना, त्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी सायंकाळी त्यांनी वल्हांडण सण साजरा केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 5:10
14 Iomraidhean Croise  

मला कळविण्यासाठी तुझा संदेश येईपर्यंत मी रानाकडील मैदानात वाट पाहीन.”


तुम्ही ते असे खावे: तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमची पायतणे पायात घातलेली व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा याहवेहचा वल्हांडण आहे.


पहिल्या महिन्यात चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी.


या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्यांची काळजी घ्यावी आणि इस्राएली लोकातील सर्वांनी सायंकाळी ते कापावेत.


परंतु बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला व सिद्कीयाहला यरीहोच्या मैदानात पकडले व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याकडे हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.


“म्हणून, हे मानवपुत्रा, निर्वासित होऊन जाण्यास तू आपले सामान बांध आणि दिवसाच्या प्रकाशात ते तुला पाहत असताच तू जिथे आहेस तिथून नीघ आणि दुसर्‍या ठिकाणाकडे जा. जरी ते बंडखोर लोक आहेत, तरी कदाचित ते समजतील.


याहवेहच्या वल्हांडण सणाची सुरुवात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून होते.


माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.”


पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी ते यार्देनेतून वर आले आणि यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे त्यांनी छावणी घातली.


वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी, त्याच दिवशी त्यांनी त्या जमिनीतील काही उपज खाल्ले: बेखमीर भाकरी आणि भाजलेले धान्य.


ते गिलगाल येथील छावणीत यहोशुआकडे आले. ते यहोशुआला आणि इस्राएली लोकांना म्हणाले, “आम्ही दूरच्या देशातून आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर शांतीचा करार करा.”


प्रतिवर्षी तो बेथेल, गिलगाल, मिस्पाह येथे अनुक्रमाने इस्राएलचा न्याय करीत फिरत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan