Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्‍यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देनेपलीकडील अमोर्‍यांच्या सर्व राजांनी व समुद्र-किनार्‍याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आणि ते गलितगात्र झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 5:1
32 Iomraidhean Croise  

अब्राम त्या प्रदेशातून प्रवास करीत शेखेम येथील मोरेहच्या मोठ्या एला वृक्षापर्यंत गेला. त्यावेळी कनानी लोक या देशात राहत होते.


आणि मी तुझ्या भावांपेक्षा तुला जमिनीचा एक भाग अधिक देतो, तो मी, माझी तलवार आणि माझे धनुष्य यांच्या बळावर, अमोरी लोकांपासून जिंकून घेतला होता.”


तेव्हा राजाने गिबोनी लोकांस बोलावून घेतले आणि त्यांना म्हटले. (गिबोनी लोक इस्राएलचा भाग नव्हते, परंतु अमोरी लोकांतून उरलेले लोक होते; त्यांना जिवंत ठेवावे अशी इस्राएली लोकांनी शपथ घेतली होती, परंतु इस्राएल आणि यहूदाह यांच्याबद्दल असलेल्या त्याच्या आवेशामुळे शौलाने त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.)


त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्‍यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे झगे, त्याचे प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेले होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली.


या सर्व गोष्टी आटोपल्यावर, यहूद्यांचे पुढारी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, “इस्राएली लोक, याजक आणि लेवी यांनी स्वतःला कनानी, हिथी, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, इजिप्तचे व अमोरी या मूर्तिपूजक लोकांच्या घृणास्पद चालीरीतीपासून अलिप्त ठेवले नाही.


अमोरी लोकांचा राजा सीहोन, बाशानचा राजा ओग आणि कनानाच्या सर्व राजाचा त्यांनी वध केला.


हिव्वी, कनानी, हिथी या लोकांनी तुमच्या मार्गातून बाजूला व्हावे म्हणून मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवेन.


बेटांनी हे बघितले व ते भयभीत झाले; पृथ्वीचा दिगंतापासून थरकाप झाला. त्यांनी प्रवेश केला व ते पुढे आले;


आणि म्हण, ‘सार्वभौम याहवेह यरुशलेमास असे म्हणतात: तुझे पूर्वज व तुझा जन्म कनानी लोकांच्या देशातील आहे; तुझा पिता अमोरी आणि तुझी आई हिथी होती.


आणि जेव्हा ते तुला विचारतील, ‘तू उसासे का टाकतोस?’ तू सांग की, ‘जी वार्ता येणार आहे म्हणून प्रत्येक हृदय भीतीने विरघळेल आणि प्रत्येक हात लुळा पडेल; प्रत्येक आत्मा अशक्त होईल आणि प्रत्येक पाय मुत्राने भिजेल.’ ते येत आहे! ते नक्कीच घडणार, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”


तेव्हा राजाचा चेहरा पांढराफटक झाला आणि त्याला एवढा धसका बसला की त्याची कंबरच खचली आणि त्याचे गुडघे थरथर कापू लागले.


“जरी ते गंधसरूंसारखे उंच व एलावृक्षांसारखे मजबूत होते, तरी मी त्यांच्यासमोर अमोरी लोकांचा संहार केला. मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासविले.


नेगेवमध्ये अमालेकी लोक राहतात. डोंगराळ प्रदेशात हिथी, यबूसी आणि अमोरी लोक राहतात. समुद्राच्या किनार्‍यावर आणि यार्देन नदीच्या खोर्‍यात कनानी लोक राहतात.”


तरीही मनश्शेहचे वंशज त्या नगरांमध्ये राहू शकत नव्हते, कारण कनानी लोकांनी त्यात राहण्याचा अट्टाहास केला होता.


परंतु अरण्यातील डोंगराळ भाग व त्याच्या टोकापर्यंतच्या हद्दी तुमच्या होतील; जरी कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत आणि ते फार शक्तिशाली आहेत, तरीही तुम्ही त्यांना घालवून देऊ शकाल.”


परंतु याहवेहची सेवा करणे तुम्हाला अप्रिय वाटत असेल, तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा, फरात नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या दैवतांची सेवा केली ती की ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या दैवतांची? परंतु मी आणि माझे घराणे, आम्ही याहवेहची सेवा करणार.”


वरून वाहत येणारे पाण्याचे प्रवाह थांबले. सारेथान जवळील आदाम नावाच्या गावात खूप अंतरावर पाण्याची एक रास झाली, तर अराबाच्या समुद्राकडे (म्हणजे मृत समुद्रात) वाहणारे पाणी पूर्णपणे कापले गेले. तेव्हा लोक यरीहो समोर नदीपलीकडे गेले.


सर्व इस्राएली लोकांच्या संपूर्ण राष्ट्राने कोरड्या जमिनीवरून पलीकडे जाईपर्यंत, याहवेहचा कराराचा कोश वाहून नेणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी थांबले आणि कोरड्या जमिनीवर उभे राहिले.


तेव्हा ते तिच्याकरिता ऊर बडवून शोक करतील. ते म्हणतील: “ ‘हाय हाय! महान बाबिलोन नगरी, ती सामर्थ्यशाली नगरी! एका क्षणात तिच्यावर न्यायाची कुर्‍हाड कोसळली आहे!’


यहोशुआच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले, “कनानी लोकांविरुद्ध युद्ध करण्यासाठी आमच्यापैकी प्रथम कोणी जावे?”


“याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराने आपल्या इस्राएली लोकांपुढून अमोर्‍यांना घालवून टाकले, तर ते परत मागण्याचा तुला कोणता अधिकार आहे?


ते लोक हे होते, पलिष्टांचे पाच शासक, कनानी, सीदोनी, व बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.


म्हणून याहवेहने त्यांना कनानातील हासोर येथील राजा याबीनच्या हाती दिले. त्याच्या सैन्याचा सेनापती सिसेरा हा हरोशेथ-हग्गोईम येथे राहणारा होता.


नंतर सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर, त्याच्या पत्नीने त्याला घडलेल्या गोष्टी सांगितल्या, ते सर्व नाबालाला सांगितले. तेव्हा त्याच्या हृदयाला धक्का बसला आणि तो दगडासारखा झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan