Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 4:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 हे त्यांनी यासाठी केले की, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळावे की याहवेह सामर्थ्यशाली आहेत आणि म्हणून तुम्ही सदैव याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल, आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचा त्यांना1 निरंतर धाक वाटेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व लोक जाणतील आणि तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे निरंतर भय बाळगाल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 4:24
24 Iomraidhean Croise  

यासाठी की जो देश आपण आमच्या पूर्वजांना दिला, त्यात जितका काळ ते राहतील त्यांनी तुमचे भय बाळगावे.


म्हणजे पृथ्वीवरील सर्व लोकांनी ओळखावे की याहवेह हेच परमेश्वर आहेत आणि दुसरा कोणीही नाही.


आता हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवा, म्हणजे याहवेह केवळ तुम्हीच परमेश्वर आहात, हे पृथ्वीवरील सर्व राज्यांना कळेल.”


नंतर नामान आणि त्याचे सर्व लोक परमेश्वराच्या मनुष्याकडे परत गेले. तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “शेवटी इस्राएलशिवाय जगामध्ये इतरत्र कुठेही परमेश्वर नाही, हे मला आता पूर्णपणे समजून चुकले आहे. तुमच्या सेवकाद्वारे आणलेल्या नजराण्यांचा कृपया स्वीकार करा.”


श्रीमंती व सन्मान तुमच्याकडूनच येतात; तुम्ही सर्व गोष्टीचे शासक आहात. सर्वांना मोठेपणा व सामर्थ्य देण्याकरिता केवळ तुमच्याच बाहूत सामर्थ्य आणि अधिकार आहे.


तुझा बाहू परमेश्वरासारखा आहे काय, तुझा आवाज त्यांच्यासारखा गडगडाट करू शकतो काय?


तरीसुद्धा आपल्या नामासाठी, आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी परमेश्वराने त्यांचे तारण केले.


तुमचे बाहू प्रबळ आहेत; तुमचा हात बळकट आहे, उंचावलेला आहे तुमचा उजवा हात.


सात्विकांच्या सभेत एकत्र पवित्र परमेश्वराचे भय दिसून येते. त्यांच्याभोवती असणार्‍या सर्वांपेक्षा ते अधिक भयावह आहेत.


जेव्हा इस्राएली लोकांनी इजिप्तच्या लोकांविरुद्ध आलेला याहवेहचा पराक्रमी हात बघितला, त्यावेळी त्यांना याहवेहचे भय वाटले आणि त्यांनी याहवेह व त्यांचा सेवक मोशे यांच्यावर विश्वास ठेवला.


तुमच्या बाहूच्या पराक्रमामुळे भीती व दहशत त्यांच्यावर येऊन पडेल. तुमचे लोक पार करेपर्यंत, हे याहवेह, जे लोक तुम्ही खंडून घेतले आहेत, ते पार होईपर्यंत ते दगडाप्रमाणे स्तब्ध राहतील.


मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. तुमची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वर आले आहेत, अशासाठी की परमेश्वराचे भय तुम्हाला पापापासून दूर ठेवण्याकरिता तुमच्याबरोबर असावे.”


परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.


याहवेह आपली पवित्र भुजा सर्व राष्ट्रांसमक्ष उघडणार आहेत, आणि पृथ्वीच्या सर्व दिगंतापर्यंत आमच्या परमेश्वराचे तारण दिसेल.


मी त्यांच्याबरोबर अनंतकाळचा करार करेन: मी त्यांचे कल्याण करणे कधीही थांबविणार नाही, त्यांना माझे भय धरण्यास प्रोत्साहित करेन, जेणेकरून ते माझ्यापासून कधीही विमुख होणार नाहीत.


मग पृथ्वीवरील सर्व लोक पाहतील की तुम्हाला याहवेहच्या नावाने संबोधित करण्यात येते, ती तुम्हाला भिऊ लागतील.


यासाठी की तुम्ही, तुमचे पुत्र, पौत्रे यांनी याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे. मी तुम्हाला दिलेले सर्व नियम व आज्ञा तुम्ही पाळत राहाल तर तुम्ही दीर्घायुष्याचा आनंद घ्याल.


आज याहवेह तुला माझ्या हाती देईल, मी तुला मारून टाकीन व तुझा शिरच्छेद करेन. या आजच्या दिवशी मी पलिष्टी सैन्याची शरीरे पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईन आणि सर्व जगाला समजेल की परमेश्वर इस्राएलात आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan