Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 4:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्या दिवशी याहवेहने यहोशुआला सर्व इस्राएली लोकांच्या दृष्टीत सन्मानित केले आणि जसे त्यांनी मोशेच्या संपूर्ण आयुष्यभर त्याचा आदर केला, तसाच त्यांनी यहोशुआचाही केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली; म्हणून जसे ते मोशेचे भय धरत तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्याच्या सगळ्या हयातीत बाळगले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली. जसे ते मोशेचे भय धरीत होते तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्यांच्या सगळ्या हयातीत धरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 4:14
14 Iomraidhean Croise  

राजाने दिलेला हा न्याय जेव्हा सर्व इस्राएलने ऐकला, तेव्हा त्यांना राजाचा आदर वाटू लागला, कारण त्यांनी पाहिले की न्याय देण्यासाठी राजाला परमेश्वराकडून ज्ञान प्राप्त झाले आहे.


यरीहोतील संदेष्ट्यांचा एक समूह, जो हे पाहत होता म्हणाला, “एलीयाहचा आत्मा अलीशावर उतरला आहे.” ते त्याला भेटण्यास गेले आणि भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले.


याहवेहने शलोमोनाला इस्राएलीदेखत सर्वाधिक सन्मान दिला आणि इस्राएलमध्ये कोणत्याही राजाला त्याच्यासारखे शाही ऐश्वर्य दिले नव्हते.


याहवेहच्या वचनास अनुसरून राजा आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले होते, ते एकमताने पूर्ण करण्यासाठी यहूदीयामध्येही परमेश्वराचा हात लोकांवर होता.


(आता याहवेहने इजिप्तमधील लोकांची मने इस्राएलांना अनुकूल होतील असे केले, मोशे स्वतः इजिप्तमध्ये फारोहच्या सेवकांच्या व इजिप्तच्या लोकांच्या दृष्टीत फार थोर झाला होता.)


जेव्हा इस्राएली लोकांनी इजिप्तच्या लोकांविरुद्ध आलेला याहवेहचा पराक्रमी हात बघितला, त्यावेळी त्यांना याहवेहचे भय वाटले आणि त्यांनी याहवेह व त्यांचा सेवक मोशे यांच्यावर विश्वास ठेवला.


माझ्या मुला, याहवेहचे आणि राजाचे भय धर आणि बंडखोर अधिकार्‍यांना सहभागी होऊ नकोस,


कारण तुमचे हित करण्यासाठी तो परमेश्वराचा नेमलेला सेवक आहे. परंतु तुम्ही अयोग्य केले, तर त्याची भीती बाळगा, कारण तो तलवार व्यर्थ धारण करीत नाही. अयोग्य करणार्‍याला शासन करण्यासाठी तो परमेश्वराचा सेवक, न्यायनीतीचा कारभारी आहे.


मेघात आणि समुद्रात त्यांचा व मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला.


मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुला मोठा सन्मान बहाल करणार आहे, म्हणजे सर्व इस्राएली लोकांना कळून येईल की, मी जसा मोशेबरोबर होतो, अगदी तसाच तुझ्याबरोबर देखील आहे.


युद्धासाठी सुसज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष याहवेहसमोर यरीहोच्या मैदानात पलीकडे गेले.


नंतर याहवेह यहोशुआला म्हणाले,


तेव्हा शमुवेलने याहवेहकडे प्रार्थना केली आणि त्याच दिवशी याहवेहने मेघगर्जना व पाऊस पाठवला. तेव्हा सर्व लोकांनी याहवेहचे आणि शमुवेलचे भय धरले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan