Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 3:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 सर्व इस्राएली लोकांच्या संपूर्ण राष्ट्राने कोरड्या जमिनीवरून पलीकडे जाईपर्यंत, याहवेहचा कराराचा कोश वाहून नेणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी थांबले आणि कोरड्या जमिनीवर उभे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले, आणि सर्व इस्राएल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देनेपलीकडे निघून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 3:17
14 Iomraidhean Croise  

तिथे एलीयाहने आपल्या झग्याची घडी केली आणि ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि ते दोघे कोरड्या भूमीवरून चालत पैलतीराला गेले.


त्यांनी समुद्रात त्यांच्यासाठी कोरडी भूमी तयार केली; ते जलातून पायी पलीकडे गेले— यास्तव त्यांच्यामध्ये आपण हर्ष करू या.


मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला आणि याहवेहने रात्रभर पूर्वेचा वारा वाहवून समुद्राचे पाणी मागे हटवून ती कोरडी जमीन केली व पाणी दुभागले.


तेव्हा इस्राएली लोक, त्यांच्या उजवी व डावीकडे पाण्याची भिंत उभी असताना, समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले.


पण इस्राएली लोक कोरड्या जमिनीवरून समुद्र पार करून गेले आणि त्यांच्या उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीप्रमाणे उभे राहिले.


सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील. सार्वभौम याहवेह सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकतील; ते त्यांच्या लोकांची अप्रतिष्ठा सर्व पृथ्वीवरून काढून टाकतील. याहवेह असे बोलले आहेत.


“इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘यार्देन पार करून तुम्ही जेव्हा कनान देशात जाल,


विश्वासाद्वारे इस्राएली लोक तांबड्या समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत गेले. त्यांचा पाठलाग करणार्‍या इजिप्तच्या लोकांनी तसेच करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते सर्व बुडून मेले.


जेव्हा सर्व लोकांनी यार्देन नदी ओलांडली, तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले,


मोशेने यहोशुआला सुचविल्याप्रमाणे, याहवेहने यहोशुआला ज्या आज्ञा होत्या, त्या पूर्ण होईपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देन नदीच्या मध्यभागी उभे राहिले, तेव्हा लोकांनी घाईने नदी ओलांडली.


त्या सर्वांनी नदी पार करणे संपविताच याहवेहचा कोश व याजक सर्व लोकांच्या देखत पलीकडे गेले.


त्यांना सांग, ‘इस्राएली लोक यार्देन नदीतून कोरड्या जमिनीवरून पलीकडे आले.’


आणि त्यांना सांग की त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून, म्हणजे जिथे याजक उभे आहेत, तिथून बारा धोंडे उचलून घ्यावे आणि ते तुमच्याबरोबर घेऊन आज रात्री ज्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात त्या ठिकाणी ठेवावे.”


आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्‍यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan