यहोशवा 24:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी साहाय्यासाठी याहवेहचा (म्हणजे माझा) धावा केला आणि मी तुमच्या व इजिप्तच्या लोकांमध्ये अंधार केला, समुद्र इजिप्तच्या लोकांवर आणला आणि त्यात त्यांना बुडवून टाकले. मी इजिप्तच्या लोकांचे काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यानंतर तुम्ही पुष्कळ काळ अरण्यात राहिला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या व मिसर्यांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले; मिसर देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिलात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला, मग त्याने तुमच्या व मिसऱ्यांच्या मध्ये काळोख पाडला, आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना बुडवले; मी मिसरात जे केले, ते तर तुमच्या डोळ्यांनी पाहिले, आणि मग तुझी रानात बहुत दिवस राहिला. Faic an caibideil |
कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?
इस्राएली लोक चाळीस वर्षे संपेपर्यत रानात भ्रमण करीत राहिले होते. इजिप्त सोडताना जे पुरुष युद्ध करण्याच्या वयाचे होते, ते सर्वजण याकाळात मरण पावले होते, कारण त्यांनी याहवेहची आज्ञा पाळली नव्हती. याहवेहनी त्यांना शपथपूर्वक सांगितले होते की, जो देश इस्राएलला देण्याचे वचन मी त्यांच्या पूर्वजास दिलेले होते त्या “दुधामधाचे प्रवाह वाहणार्या” देशात, मी त्यांना प्रवेश करू देणार नाही.