Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 23:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तुमच्यामध्ये जी उर्वरित राष्ट्रे आहेत त्यांच्याशी संगती करू नका; त्यांच्या दैवतांची नावे घेऊ नका किंवा त्यांची शपथही घेऊ नका. तुम्ही त्यांची सेवा करू नये किंवा त्यांना नमन करू नये

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका; त्यांच्या देवांचे नावही घेऊ नका, त्यांची शपथ कोणाला वाहायला लावू नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना दंडवत घालू नका;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली आहेत त्यांमध्ये तुम्ही जाऊ नका, आणि त्यांच्या देवांच्या नावांची आठवण करू नका, आणि त्यांची शपथ घालू नका; त्यांची सेवाही करू नका, आणि त्यांच्या पाया पडू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 23:7
23 Iomraidhean Croise  

याहवेहने त्यांना सांगितले होते, “तुम्ही असे करू नये” तरी त्यांनी मूर्तींची उपासना केली.


मात्र एक गोष्टींसाठी याहवेहने आपल्या सेवकाला क्षमा करावी: माझा धनी, म्हणजे राजा, रिम्मोन मंदिरात नमन करण्यास जातात, त्यावेळी त्यांना माझ्या हाताच्या आधाराची गरज पडते आणि त्याच्याबरोबर मलाही नमन करावे लागते—जेव्हा मी रिम्मोन मंदिरात नमन करतो, तेव्हा याहवेहने आपल्या सेवकाला क्षमा करावी.”


“परंतु जर तुम्ही दूर वळले आणि मी तुला दिलेले विधी आणि आज्ञा पाळल्या नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली,


जे अन्य दैवतांच्या भजनी लागतात, ते अनेक दुःखांनी ग्रासले जातील. अशा दैवतांना मी रक्तमय पेयार्पणे अर्पिणार नाही किंवा त्यांची नावेही मी माझ्या ओठांनी उच्चारणार नाही.


तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो.


“जे काही मी तुम्हाला सांगितले आहे ते काळजीपूर्वक पाळावे. इतर दैवतांचा धावा करू नये; तुमच्या मुखांनी त्यांचे नावही घेऊ नये.


त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नये, नाहीतर ते तुम्हाला माझ्याविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करतील, कारण त्यांच्या दैवतांची उपासना करणे तुमच्यासाठी खचितच पाश असे होईल.”


दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, किंवा दुष्कृत्ये करणार्‍यांच्या मार्गाने जाऊ नकोस.


आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील.


“मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.


मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन; यापुढे त्यांची नावे कधीही घेतली जाणार नाही.


जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात. जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात, आणि मोलेख दैवताचीही शपथ घेतात,


याशिवाय नबो, बआल-मेओन (यांची नावे बदलली गेली) व सिबमाह हे देखील. ज्या नगरांची त्यांनी पुनर्बांधणी केली त्या नगरांना त्यांनीच नावे दिली.


“ ‘पण त्या ठिकाणच्या रहिवाशांना तुम्ही जर घालवले नाही, व त्यांना तुम्ही तिथेच राहू दिले, तर ते तुमच्या डोळ्यांना कुसळांसारखे आणि तुमच्या कूशीला काट्यांसारखे होतील. ज्या देशात तुम्ही राहाल त्यामध्ये ते तुम्हाला त्रास देतील.


तुम्ही फसविले जाऊ नका: “वाईटाची संगती चांगल्या चरित्रांना बिघडवते.”


अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा.


याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या.


तुम्ही याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, फक्त त्यांचीच सेवा करावी आणि त्यांच्याच नावाने शपथ वाहवी.


इतर दैवतांच्या, तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या दैवतांच्या मागे लागू नका;


“परंतु जर तुम्ही मागे फिराल आणि या राष्ट्रांतील उर्वरित जे लोक तुमच्यामध्ये राहतात त्यांच्याबरोबर स्वतःला जोडाल, त्यांच्याबरोबर सोयरीक कराल आणि त्यांची संगत धराल


परंतु आतापर्यंत जसे तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वर यांना धरून राहिलात तसेच राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan