Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 23:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेह, तुमचे परमेश्वरांनी तुमच्यासाठी या सर्व राष्ट्रांचे जे काही केले, ते सर्वकाही तुम्ही स्वतःच पाहिले आहे. ते याहवेहच तुमचे परमेश्वर होते जे तुमच्यासाठी लढले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुमच्यासाठी तुमचा देव परमेश्वर ह्याने ह्या सर्व राष्ट्रांचे काय केले हे तुम्ही पाहिले आहे, कारण तुमचा देव परमेश्वर स्वत: तुमच्यासाठी लढला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुमच्यासाठी, या सर्व राष्ट्रांसोबत तुमचा देव परमेश्वर याने सर्वकाही कसे केले, हे सर्व तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. कारण परमेश्वर देव, जो स्वतः केवळ तुमच्यासाठी लढला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 23:3
13 Iomraidhean Croise  

याहवेह तुमच्यासाठी लढतील; तुम्ही केवळ स्तब्ध राहा.”


‘मी इजिप्तच्या लोकांचे काय केले आणि तुम्हाला गरुडाच्या पंखावर माझ्याकडे कसे वाहून आणले, ते तुम्ही स्वतःच पाहिले आहे.


जो देश मी त्यांना शपथ वाहून देऊ केला होता, त्यात जेव्हा मी त्यांना आणले आणि त्यांनी एखादे उंच डोंगर किंवा दाट पानांनी भरलेले झाड पाहिले, तिथे त्यांनी यज्ञ केले, माझा राग पेटेल अशी अर्पणे त्यांनी केली, त्यांचे सुवासिक धूप सादर करीत त्यांची पेयार्पणे ओतली.


तू स्वतःच्या डोळ्याने बघशील व म्हणशील, ‘इस्राएलच्या सीमेपलीकडे देखील याहवेह महान आहेत!’


कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यापुढे जात आहेत, ते तुमच्यावतीने त्यांच्याशी लढतील, जसे तुमच्या डोळ्यादेखत त्यांनी इजिप्त देशात आणि अरण्यात असताना केले. ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेतो, त्याप्रमाणे याहवेह परमेश्वराने इथे पोहोचेपर्यंत तुमची सतत काळजी घेतली.”


कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर जात आहेत. ते तुमच्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतील आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देतील.”


तुम्ही स्वतःबद्दल जागरूक असणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी विसरून जाऊ नये आणि आयुष्यभर त्या तुमच्या स्मरणातून निघून जाऊ नये. तुम्ही ते तुमच्या पुत्रांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रांना शिकवा.


तुम्ही स्वतःशी म्हणाल, “ही राष्ट्रे आमच्यापेक्षा कितीतरी सामर्थ्यवान आहेत. आम्ही त्यांना कसे काय घालवून देऊ?”


ते त्यांच्या राजांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांची नावे या पृथ्वीतलावरून पुसून टाकाल. मग कोणीही तुमच्याविरुद्ध उभा राहणार नाही; तुम्ही त्यांचा नाश कराल.


असा दिवस यापूर्वी कधीही आला नव्हता आणि त्यानंतरही कधी आला नाही. त्या दिवशी, याहवेहने एका मनुष्याचा शब्द ऐकला. कारण याहवेह निश्चितच इस्राएलसाठी लढत होते!


यहोशुआने हे सर्व राजे व त्यांची भूमी एकाच मोहिमेत जिंकले, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर इस्राएलसाठी लढले.


तुमच्यातील एकजण हजारांना पळवून लावतो, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे, याहवेह तुमच्यासाठी लढतात,


Lean sinn:

Sanasan


Sanasan