Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 23:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याहवेह तुमच्या परमेश्वरांनी जो करार तुम्हास आज्ञापिला आहे त्याचे जर तुम्ही उल्लंघन केले, आणि जाऊन इतर दैवतांची सेवा केली आणि त्यांना नमन केले, तर याहवेहचा क्रोध तुमच्याविरुद्ध भडकेल आणि या चांगल्या प्रदेशातून जो त्यांनी तुम्हाला दिला आहे त्यातून तुमचा लवकरच नाश होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तुमचा देव परमेश्वर ह्याने जो करार पाळण्याची तुम्हांला आज्ञा दिली आहे त्याचे उल्लंघन करून अन्य देवांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकेल आणि जो उत्तम देश त्याने तुम्हांला दिला आहे त्यातून तुमचा नायनाट त्वरित होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तुमचा देव परमेश्वर याने जो करार पाळण्याची तुम्हाला आज्ञा केली आहे, तो मोडून दुसऱ्या देवाची सेवा कराल, आणि त्यांना नमन कराल, तर देवाचा राग तुम्हावर भडकेल, आणि जो उत्तम देश त्याने तुम्हाला दिला आहे, त्यातून तुम्हाला त्वरीत नष्ट करील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 23:16
16 Iomraidhean Croise  

याहवेह इस्राएलवर असा वार करतील की ते वाहत्या पाण्यावरील बोरूप्रमाणे होतील. जी चांगली भूमी मी त्यांच्या पूर्वजांना दिली, त्यातून मी त्यांना उपटून टाकीन व फरात नदीपलीकडे त्यांना पांगून टाकीन, कारण त्यांनी अशेराची खांब तयार करून याहवेहला क्रोधित केले आहे.


“पण जर तू किंवा तुझी संतती माझ्यापासून दूर वळली आणि मी तुला दिलेल्या आज्ञा व विधी पाळले नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली,


तर जो देश मी त्यांना दिला आहे त्यातून मी इस्राएली लोकांना छेदून टाकीन आणि हे मंदिर जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. मग इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टा व निंदेचा विषय होतील.


हे सर्व यासाठी घडले की इस्राएलने याहवेह त्यांच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले, ज्यांनी त्यांना इजिप्तचा राजा फारोहच्या हातून इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले होते, त्यांनी इतर दैवतांची उपासना केली


यरुशलेम व यहूदीयामध्ये हे सर्व याहवेहच्या क्रोधामुळे घडले आणि शेवटी त्यांनी या लोकांना स्वतःच्या समक्षतेतून काढून टाकले. आता सिद्कीयाहने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.


पृथ्वीला तिच्या लोकांनी भ्रष्ट केले आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, कायदे भंग केले आहेत आणि अनंतकाळाचा करार मोडला आहे!


ते इथे आले व त्यांनी या देशाचा ताबा घेतला, परंतु तुमचे आज्ञापालन करण्याचे व तुमचे नियम अनुसरण्याचे त्यांनी नाकारले; म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणले आहे.


“पाहा, वेढा घालणार्‍यांनी शहराचा ताबा घेण्यासाठी भिंत बांधली आहे. तलवार, दुष्काळ व मरी यांच्यामुळे हे शहर हल्ला करणाऱ्या खास्द्यांच्या हाती पडेल. तुम्ही जे होईल असे म्हटले होते, तेच आता घडतांना तुम्ही बघू शकता.


आणि मग जसे मी त्यांचे करण्याचे योजले आहे, तसे तुमचे करेन.’ ”


आणि त्यांनी माझ्या आज्ञेच्या विरुद्ध अन्य दैवतांची उपासना केली, त्यांना किंवा सूर्य किंवा चंद्र किंवा आकाशातील तारे यांना नमन केले,


परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही ऐकले नाही व त्यांच्या सर्व आज्ञा व विधी ज्या मी तुम्हाला आज देत आहे त्यांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुम्हावर येतील आणि तुम्हाला येऊन गाठतील:


कारण याहवेह तुमचे परमेश्वर, जे तुम्हामध्ये आहेत, ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत, यामुळे त्यांचा राग भडकेल व ते तुम्हाला या पृथ्वीवरून नष्ट करून टाकतील.


याहवेहचा राग इस्राएलावर भडकला, त्यांनी त्यांना लुटारूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांना लुटले. ज्यांचा ते सामना करू शकत नव्हते अशा त्यांच्या सभोवतालच्या सर्व शत्रूच्या हाती विकले.


यासाठी याहवेहचा क्रोध इस्राएलविरुद्ध भडकला आणि त्यांनी जाहीर केले, “कारण या इस्राएली राष्ट्राने त्यांच्या पूर्वजांशी मी केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे आणि माझे ऐकले नाही,


परंतु तुम्ही पाप करीत राहाल, तर तुम्ही आणि तुमचा राजा नाश पावाल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan