Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 22:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “तुमची मोठी संपत्ती घेऊन घरी जा—गुरांचा मोठा कळप, चांदी, सोने, कास्य आणि लोखंड आणि पुष्कळ वस्त्रे आणि तुमच्या शत्रूपासून मिळालेली लूट आपल्या इस्राएली बांधवांसह वाटून घ्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 “विपुल पशू आणि रुपे, सोने, कांसे, लोखंड आणि भरपूर वस्त्रे अशी अमाप संपत्ती घेऊन आपापल्या डेर्‍यांकडे परत जा; आपल्या शत्रूंपासून मिळवलेली लूट आपल्या भाऊबंदांबरोबर वाटून घ्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा त्याने त्यांना असे सांगितले की, “बहुत द्रव्य व पुष्कळ पशुधन, रुपे आणि सोने, तांबे व लोखंड, आणि पुष्कळ वस्त्रे घेऊन तुम्ही आपल्या तंबूकडे माघारी जा आपल्या भावांबरोबर आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 22:8
12 Iomraidhean Croise  

पूर्वेकडे फरात नदीजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्यांनी वस्ती केली, कारण गिलआद देशात त्यांचे पशुधन भरपूर वाढले होते.


याहवेहनी त्याचे राज्य त्याच्या नियंत्रणाखाली स्थापन केले; आणि यहूदीयाच्या सर्व लोकांनी यहोशाफाटकडे भेटवस्तू आणल्या, त्यामुळे त्याला मोठी संपत्ती आणि सन्मान मिळाला.


हिज्कीयाहकडे फार मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने त्याच्याकडे असलेले चांदी आणि सोने आणि मौल्यवान रत्ने, मसाले, ढाली आणि सर्वप्रकारच्या मौल्यवान वस्तूंसाठी भांडारे तयार केली.


“राजे आणि सेनांनी पळ काढला आहे; घरी राहिलेल्या स्त्रिया लूट वाटून घेत आहेत.


तिच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे; आणि धन व सन्मान तिच्या डाव्या हातात आहेत.


लुटीचे दोन समान भाग करावेत. एक भाग लढाईवर गेलेल्या सैनिकांना व दुसरा भाग समाजातील इतरांना द्यावा.


यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.


इजिप्त देशामधील सर्व भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता.


मग त्याने दावीदाला तिथे नेले, तेव्हा पाहा, ते त्या भागात सर्वत्र पसरले होते. खात, पीत व मौजमजा करीत होते, कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या व यहूदीयाच्या देशातून मोठी लूट आणली होती.


याबाबत तुमचे कोण ऐकणार? जो मनुष्य सामानाजवळ राहतो त्याचा वाटा तेवढाच असणार जेवढा लढाईवर गेलेल्या व्यक्तीचा असणार. सर्वांना सारखाच वाटा मिळणार.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan