Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 22:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तेव्हा यहोशुआने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांच्या घरी रवाना झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मग यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन रवाना केले, आणि ते आपापल्या डेर्‍यांकडे चालते झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला, मग ते आपआपल्या तंबूकडे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 22:6
18 Iomraidhean Croise  

आणि त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ते परात्पर परमेश्वराद्वारे अब्राम आशीर्वादित असो.


नंतर याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला आणि त्याच्या उपस्थितीतून निघाला.


मग योसेफाने आपला पिता याकोब याला फारोहकडे उपस्थित केले आणि याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला.


होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर, दावीदाने लोकांना सर्वसमर्थ याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला.


नंतर त्याने तिथे जमलेल्या इस्राएली लोकांच्या समुदायातील प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप, मनुक्याची एक वडी दिली, मग सर्व लोक आपआपल्या घरी गेले.


दावीद जेव्हा आपल्या घराण्याला आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला, तेव्हा शौलाची मुलगी मीखल त्याला भेटण्यास बाहेर आली आणि म्हणाली, “आज इस्राएलाच्या राजाने एखाद्या असभ्य माणसाप्रमाणे आपल्या चाकरांच्या कन्यांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरून स्वतःस किती प्रतिष्ठित केले आहे!”


आठव्या दिवशी त्याने लोकांना रवाना केले. तेव्हा त्यांनी राजाला आशीर्वाद दिला आणि याहवेहने आपला सेवक दावीद व इस्राएलच्या लोकांसाठी जी सर्व चांगली कृत्ये केली त्यासाठी त्यांच्या अंतःकरणात हर्ष आणि आनंद होता.


एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी.


मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.


मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळाची आई मरीयाला म्हणाला: “इस्राएलमध्ये अनेकांचे पतन व पुन्हा उठणे आणि ज्या विरुद्ध लोक बोलतील, हा असे चिन्ह होईल, यासाठी या बालकाला नेमून ठेवले आहे.


यानंतर येशूंनी त्यांना बेथानी गावापर्यंत नेले आणि आपले हात वर करून आशीर्वाद दिला.


तेव्हा यहोशुआने यफुन्नेहचा पुत्र कालेबाला आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन त्याचे वतन म्हणून दिले.


नंतर यहोशुआने त्या लोकांना आपआपल्या वतनास पाठवून दिले.


शमुवेलने राजपदाचे हक्क आणि कर्तव्ये लोकांना समजावून सांगितली. त्याने ती एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहून ठेवली आणि ती याहवेहसमोर ठेवली. नंतर शमुवेलने लोकांना आपआपल्या घरी पाठवून दिले.


शौलाने इस्राएलमधून तीन हजार पुरुष निवडले. दोन हजार त्याच्याजवळ मिकमाश येथे आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये होते आणि एक हजार बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे योनाथान बरोबर होते. बाकीच्या पुरुषांना त्याने आपआपल्या घरी पाठवून दिले.


एलकानाह आणि त्याची पत्नी यांना एली आशीर्वाद देताना म्हणे, “या स्त्रीने ज्याच्यासाठी प्रार्थना केली आणि याहवेहला दिले त्याच्या बदल्यात या स्त्रीपासून याहवेह तुला लेकरे देवो.” त्यानंतर ते त्यांच्या घरी जात असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan