Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 22:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मात्र परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने दिलेली आज्ञा व नियमशास्त्र निष्ठापूर्वक पाळा, म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करा, त्याच्या सर्व मार्गांनी चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याला धरून राहा आणि जिवेभावे त्याची सेवा करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या आज्ञा आणि जे शास्त्र दिले आहे; त्याचे काटेकोरपणे पालन करण्याविषयी जपा. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावी, सर्व मार्गांत त्याचे अनुसरण करावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्याच्याशी बिलगून रहावे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार जपा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 22:5
50 Iomraidhean Croise  

जे इतरांशी न्यायाने वागतात, आणि नेहमीच नीतीने आचरण करतात, ते आशीर्वादित असतात.


मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील आणि त्यांची कृत्ये विसरणार नाहीत तर त्यांच्या आज्ञा पाळतील.


ते म्हणाले, “जर तुम्ही याहवेह, तुमच्या परमेश्वराचा शब्द काळजीपूर्वक ऐकाल व त्यांच्या नजरेत जे योग्य ते कराल, जर त्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊन त्यांचे सर्व नियम पाळाल, तर मी इजिप्तवर ज्या पीडा आणल्या होत्या, त्या तुमच्यावर आणणार नाही, कारण मी याहवेह, तुम्हाला आरोग्य देणारा आहे.”


परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.


“जे काही मी तुम्हाला सांगितले आहे ते काळजीपूर्वक पाळावे. इतर दैवतांचा धावा करू नये; तुमच्या मुखांनी त्यांचे नावही घेऊ नये.


तुमचे परमेश्वर याहवेह यांची सेवा करा, म्हणजे तुमच्या अन्नावर व पाण्यावर त्यांचा आशीर्वाद राहील. तुमच्यातून मी आजार नाहीसे करेन,


सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर, कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते.


जी भाकर नाही त्या अन्नपदार्थांवर व्यर्थ पैसे का खर्च करावे, आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी कष्ट का करावे? ऐका, माझे ऐकून घ्या आणि जे चांगले आहे ते खा, आणि हे उत्तम अन्नपदार्थ खाऊन तुम्ही अत्यंत आनंदित व्हाल.


आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील.


येशूंनी उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’


येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’”


“कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्‍यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्‍याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.


आमच्या शत्रूंच्या हातून आमची सुटका करावी, आणि समर्थ होऊन निर्भयतेने त्यांची सेवा करावी,


जर कोणी माझी सेवा करेल तर त्यांनी मला अनुसरावेच; म्हणजे जिथे मी आहे, तिथे माझा सेवक असेल. जे कोणी माझी सेवा करेल त्यांचा सन्मान माझा पिता करतील.


“जर तुमची मजवर प्रीती असेल, तर माझ्या आज्ञा पाळा.


जेव्हा तो तिथे आला आणि परमेश्वराच्या कृपेमुळे जे काही झाले होते ते पाहून तो आनंदित झाला आणि त्या सर्वांनी पूर्ण मनाने प्रभूबरोबर एकनिष्ठ राहावे असे त्याने त्या सर्वांना उत्तेजन दिले.


जो माझा परमेश्वर आहे आणि ज्याची मी सेवा करतो, त्याचा एक देवदूत काल रात्री माझ्याजवळ उभा राहिला


ज्या परमेश्वराची सेवा मी माझ्या आत्म्याने व त्याच्या पुत्राच्या शुभवार्तेचा संदेश गाजवून करतो, ते माझे साक्षी आहेत की, मी नेहमीच तुमची आठवण करीत असतो.


प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा.


आणि आपल्याला माहीत आहे की, परमेश्वरावर प्रीती करणारे आणि जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्या कल्याणार्थ सर्वगोष्टी सहकारी ठरतात.


याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या.


याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी आणि नेहमी त्यांचे विधी, त्यांचे नियम आणि त्यांच्या आज्ञा पाळाव्यात.


आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा जर तुम्ही अगदी विश्वासूपणे पाळाल—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने व पूर्ण जिवाने प्रीती कराल व त्यांची सेवा कराल—


मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळाल—याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती कराल, आज्ञाधारकपणे त्यांच्या मार्गावर चालत राहाल आणि त्यांना बिलगून राहाल—


याहवेह तुमच्या परमेश्वराचेच तुम्ही अनुसरण करावे व त्यांचेच भय बाळगावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, त्यांची वाणी ऐकावी; त्यांची सेवा करावी व त्यांनाच बिलगून राहावे.


परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील.


पण याहवेह तुमच्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेले तुम्ही सर्वजण आजही जिवंत आहात.


तुम्ही जर ते पाळले तर तुम्ही सुज्ञ व समंजस आहात अशी तुमची किर्ती होईल. जेव्हा सभोवतालची राष्ट्रे या नियमांविषयी ऐकतील तेव्हा ती म्हणतील, “इस्राएली राष्ट्रातील लोक निश्चितच बुद्धिमान व समंजस आहेत.”


तुम्ही स्वतःबद्दल जागरूक असणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी विसरून जाऊ नये आणि आयुष्यभर त्या तुमच्या स्मरणातून निघून जाऊ नये. तुम्ही ते तुमच्या पुत्रांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रांना शिकवा.


परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.


याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळाव्या आणि त्यांची बोधवचने व नियमांचेही जपून पालन करावे.


परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा.


जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, प्रभूने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना जो जीवनी मुकुट देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.


माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ऐका, परमेश्वराने जगाच्या दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासामध्ये धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना वचनानुसार राज्याचे वारस होण्यास निवडले नाही का?


परंतु आतापर्यंत जसे तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वर यांना धरून राहिलात तसेच राहा.


ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!


“भिऊ नका,” शमुवेलने उत्तर दिले. “तुम्ही हे सर्व वाईट केले आहे; तरी आता याहवेहपासून दूर वळू नका, परंतु तुमच्या सर्व हृदयाने याहवेहची सेवा करा.


परंतु याहवेहचे भय धरून प्रामाणिकपणे तुमच्या सर्व हृदयाने त्यांची सेवा करण्याविषयी खात्री बाळगा; त्यांनी तुम्हासाठी जी महान कृत्ये केली आहेत ती लक्षात ठेवा.


आणि शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “जर तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने याहवेहकडे परत वळत आहात, तर तुम्ही अन्य दैवते व अष्टारोथचा त्याग करा; आणि याहवेहकडे चित्त लावून केवळ त्यांचीच सेवा करा; म्हणजे याहवेह तुम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून सोडवतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan