Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 20:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तेव्हा त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातील केदेश; एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम; आणि यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) ही वेगळी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ह्यावरून त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातले केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 यास्तव त्यांनी गालीलात नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन, ही वेगळी करून ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 20:7
22 Iomraidhean Croise  

साराह ही कनान देशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) येथे मरण पावली. अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करण्यास गेला.


रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले.


नफताली गोत्रातून गालीलातील केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली.


रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले होते.


“लेवी लोकांना जी शहरे तुम्ही द्याल, त्यापैकी सहा शहरे आश्रयाची शहरे म्हणून असावीत, जर एखाद्या व्यक्तीने कोणाला जिवे मारले तर त्याने त्यात पळून जावे. त्याचबरोबर इतर बेचाळीस नगरे लेवी लोकांना द्यावीत.


त्या दिवसात मरीया लगेच तयारी करून यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावाकडे घाईघाईने गेली.


कारण मी आज तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन केले—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती केली व त्यांच्या मार्गात आज्ञाधारकपणे चाललात—तर तुम्ही आणखी तीन शहरे निवडावीत.


नंतर मोशेने यार्देनेच्या पूर्वेस तीन शहरे नेमली;


केदेशचा राजा-एक, कर्मेलातील योकनामाचा राजा-एक,


(त्यापूर्वी हेब्रोनचे नाव किर्याथ-अर्बा असे होते, कारण अर्बा अनाकी लोकातील सर्वात महान व्यक्ती होता.) मग सर्व देशास युद्धापासून विसावा मिळाला.


आणि यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे यफुन्नेहचा पुत्र कालेबाला यहूदाहच्या कुळाबरोबर जो वाटा दिला तो हा: किर्याथ-अर्बा म्हणजेच हेब्रोन. (अर्बा हा अनाकांचा पूर्वज होता.)


तटबंदीची नगरे सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ,


अदमाह, रामाह, हासोर,


केदेश, एद्रेई, एन-हासोर,


यार्देनेच्या पूर्वेकडे (यरीहोच्या पलीकडे) त्यांनी रऊबेन गोत्राच्या पठारावरील रानात असलेले बेसेर, गाद गोत्राच्या प्रदेशातील गिलआदातील रामोथ; आणि मनश्शेहच्या गोत्राच्या प्रदेशातील बाशानातील गोलान ही आश्रयस्थाने म्हणून वेगळी केली.


त्यांना यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) व त्याची सभोवतालची कुरणे दिली. (अर्बा हा अनाकाचा पूर्वज होता.)


म्हणून अहरोन याजकाच्या वंशजांना त्यांनी हेब्रोन (हत्या केलेल्या व्यक्तीसाठी एक आश्रयाचे शहर), लिब्नाह,


एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्यांना दिलेली नगरे ही: शेखेम (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) आणि गेजेर,


नफतालीच्या गोत्राकडून: गालीलातील केदेश (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), हम्मोथ-दोर व करतान ही तीन नगरे त्यांच्या कुरणासह देण्यात आली.


नंतर यहोशुआने इस्राएलांच्या सर्व गोत्रांना शेखेम येथे एकत्र केले. त्याने इस्राएलचे वडीलजन, पुढारी, न्यायाधीश व सर्व अधिकाऱ्यांना बोलाविले आणि त्या सर्वांनी स्वतःस परमेश्वरासमोर सादर केले.


यरूब्बआलचा पुत्र अबीमेलेख हा आपल्या आईच्या भावांना भेटण्यासाठी शेखेम येथे गेला आणि त्यांना व आपल्या आईच्या सर्व घराण्याला तो बोलला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan