Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू; आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या वडिलाच्या घराण्यावर दया करू, आणि मला अचूक खूण द्या,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 2:12
24 Iomraidhean Croise  

तर परमेश्वराच्या नावाने तू मला असे वचन दे की, तू माझ्याशी, माझ्या मुलांशी किंवा वंशजांशी कपटनीतीने वागणार नाहीस. ज्याप्रमाणे मी तुझ्याशी मित्रत्वाने वागलो आहे, त्याप्रमाणेच तूही माझ्या देशाशी मित्रत्वानेच वागशील.”


स्वर्ग व पृथ्वीचे परमेश्वर याहवेह यांच्या नावाने मला वचन दे की, माझ्या मुलाचा मी राहत असलेल्या स्थानिक कनानी मुलीबरोबर विवाह करून देणार नाहीस,


तेव्हा सेवकाने त्याचा धनी अब्राहामाच्या मांडीखाली हात ठेऊन ही बाब शपथपूर्वक मान्य केली.


पण जेव्हा तुझ्याबरोबर सर्वकाही ठीक होईल, तेव्हा माझी आठवण ठेव आणि माझ्यावर कृपा दाखव, फारोहजवळ माझा उल्लेख कर आणि मला या तुरुंगातून बाहेर काढ.


ज्याने त्याला परमेश्वराच्या नावाने शपथ घ्यायला लावली होती, त्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरविरुद्धही त्याने बंड केले. तो ताठ मानेचा झाला आणि त्याने त्याचे हृदय कठोर केले आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्याकडे तो वळला नाही.


कारण माझ्या लोकांची कत्तल आणि नायनाट झालेला पाहणे, मला कसे सहन होईल? माझ्या कुटुंबाचा नाश पाहणे मी कसे सहन करेन?”


तुम्ही राहत असलेल्या घरांच्या दारांवर असलेले रक्त हे तुमच्याकरिता चिन्ह असेल, जेव्हा मी ते रक्त पाहीन, तेव्हा मी तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. जेव्हा मी इजिप्तला तडाखा देईन, तेव्हा कोणतीही विनाशी पीडा तुम्हाला स्पर्श करणार नाही.


आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील.


आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.”


ते निर्बुद्धि, विश्वासघातकी, प्रीतिशून्य आणि दयाहीन असे झाले.


परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्‍यापेक्षा वाईट आहे.


कारण जे कोणी दयावान नाहीत त्यांचा न्याय दयेवाचून होईल. दया न्यायावर विजय मिळविते.


की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.”


जर त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर रस्त्यावर जातील तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर राहेल, आम्ही त्याला जबाबदार नसणार. जे तुझ्या घरात तुझ्याबरोबर आहेत जर त्यांना काही झाले तर त्यांचे रक्त आमच्या माथ्यावर असेल.


ज्यांनी तो देश हेरला होता त्या दोन हेरांना यहोशुआ म्हणाला, “त्या वेश्येच्या घरी जा आणि तिला व तिच्याबरोबर असलेल्या तिच्या नातेवाईकांना तुम्ही वचन दिल्याप्रमाणे बाहेर काढा.”


नंतर यहोशुआने त्यांनी जगावे यासाठी त्यांच्याबरोबर शांतीचा करार केला आणि मंडळीच्या पुढार्‍यांनी शपथेच्याद्वारे या गोष्टीला संमती दिली.


एका मनुष्याला शहरातून बाहेर येताना हेरांनी पाहिले आणि ते त्याला म्हणाले, “नगरात कसे जायचे ते आम्हाला दाखव आणि आम्ही पाहू की तुझ्याशी चांगले वागले जाईल.”


दावीदाने विचारले, “छापा टाकलेल्या त्या टोळीकडे मला नेशील काय?” तो म्हणाला, “तुम्ही मला मारून टाकणार नाही किंवा मला माझ्या धन्याच्या स्वाधीन करणार नाही, अशी परमेश्वरापुढे शपथ घ्या, मग मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan