Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 2:11
27 Iomraidhean Croise  

म्हणजे पृथ्वीवरील सर्व लोकांनी ओळखावे की याहवेह हेच परमेश्वर आहेत आणि दुसरा कोणीही नाही.


नंतर नामान आणि त्याचे सर्व लोक परमेश्वराच्या मनुष्याकडे परत गेले. तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “शेवटी इस्राएलशिवाय जगामध्ये इतरत्र कुठेही परमेश्वर नाही, हे मला आता पूर्णपणे समजून चुकले आहे. तुमच्या सेवकाद्वारे आणलेल्या नजराण्यांचा कृपया स्वीकार करा.”


आमच्या शत्रूंनी व आजूबाजूच्या देशांनी याबद्दल ऐकले, तेव्हा ते घाबरले आणि त्यांचा आत्मविश्वास ढासाळला, कारण हे कार्य आमच्या परमेश्वराच्या मदतीनेच झाले आहे, याची त्यांना जाणीव झाली.


राजाचे फर्मान ज्या प्रत्येक शहरात आणि प्रत्येक प्रांतात जाऊन पोहोचले तेव्हा तेथील सर्व यहूद्यांनी मेजवान्या देऊन उत्सव साजरा करून आपला हर्ष व उल्हास प्रकट केला. इतर देशातील अनेक लोक यहूदी बनले, कारण यहूदी आपला जबरदस्तीने ताबा घेतील अशी त्यांना भीती वाटली.


सर्व राष्ट्रे तुमच्या नामाचे भय धरतील, पृथ्वीवरील सर्व राजे तुमच्या गौरवासमोर नतमस्तक होतील.


माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे, माझी सर्व हाडे सांध्यातून निखळली आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्याआत वितळून गेले आहे.


त्यांना पाण्यासारखे वाहू द्या आणि विलीन करा; जेव्हा ते धनुष्य रोखतात, तेव्हा त्यांचे बाण लक्ष्य गाठू नयेत.


त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.


राष्ट्रे हे ऐकून थरथर कापतील; पलिष्टी भीतीने ग्रासून जातील.


एदोमाचे अधिकारी घाबरून जातील, मोआबाचे पुढारी थरथर कापू लागतील, कनानातील लोक वितळून जातील;


या कारणामुळे सर्वांचे हात शक्तिहीन होतील, प्रत्येकाचे हृदय भीतीने वितळून जाईल.


इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी: पाहा, याहवेह वेगवान ढगावर स्वार होऊन इजिप्तला येत आहेत. इजिप्तच्या मूर्ती त्यांच्यापुढे थरथर कापतात, आणि इजिप्तच्या लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून जातात.


म्हणजे त्यांची हृदये भीतीने पाणी पाणी होतील आणि पुष्कळ पडतील, कत्तल करण्यासाठीच ही तलवार त्यांच्या सर्व फाटकांवर मी नेमली आहे. पाहा! विजेसारखा वार करण्यास ती बनविली गेली आहे, हत्येसाठी ती उपसली गेली आहे.


ती लुटल्या गेली, लुबाडल्या गेली व विवस्त्र करण्यात आली आहे! तिच्या लोकांची अंतःकरणे वितळून गेली आहेत व गुडघे निकामी झाले आहेत, त्यांची शरीरे थरथर कापत आहेत व त्यांचे चेहरे फिके पडले आहेत.


आम्ही आता कुठे जावे? आमच्या हेरबंधूंच्या वार्तेमुळे आम्ही भयभीत झालो आहोत. ते म्हणतात की, ‘त्या देशातील लोक आपल्यापेक्षा धिप्पाड आणि बलवान आहेत. त्यांची नगरे खूप मोठी असून नगरतट तर इतके उंच आहेत की ते जणू काही आकाशाला भिडले आहेत. आम्ही तिथे अनाकाचे वंशज देखील पाहिले आहेत.’ ”


मग सेनाधिकारी पुढे म्हणेल, “तुम्हापैकी कोणी भेकड वा भित्रा आहे का? जर असेल, तर इतर सैनिकांना घाबरवून टाकण्यापूर्वी त्याने घरी निघून जावे.”


वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर याहवेहच परमेश्वर आहेत, हे आजच स्वीकारा आणि तुमच्या अंतःकरणात ठेवा. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही.


परंतु माझ्याबरोबर गेलेल्या माझ्या इस्राएली बांधवांनी लोकांचे अंतःकरण भयभीत केले. तरीही मी, याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले,


ते यहोशुआला म्हणाले, “याहवेहने तो संपूर्ण प्रदेश निश्चितच आपल्या हाती दिला आहे; तेथील सर्व लोक आपल्यामुळे भयभीत झालेले आहेत.”


आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्‍यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही.


आयच्या लोकांनी त्यांच्यातील छत्तीसजणांना मारून टाकले. त्यांनी इस्राएली सैनिकांचा वेशीपुढे शबारीमपर्यंत पाठलाग केला; यामुळे लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून पाण्यासारखी झाली.


तेव्हा त्यांनी यहोशुआला उत्तर दिले, “कारण आम्हाला असे सांगण्यात आले होते की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी आपला सेवक मोशेला हा संपूर्ण प्रदेश जिंकून घेण्याची आणि त्यात राहणार्‍या सर्व लोकांना नष्ट करण्याची आज्ञा दिली होती. म्हणून तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जिवाबद्दल भीती वाटू लागली; म्हणूनच आम्ही हे केले.


ते डोंगरटेकड्यांना उद्देशून ओरडून विनवू लागले, “आम्हावर पडून जे राजासनावर बसले आहेत, त्यांच्या नजरेपासून आणि कोकर्‍याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा!


Lean sinn:

Sanasan


Sanasan