Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 18:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तेव्हा शिलोह येथे याहवेहसमोर यहोशुआने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या व तिथे त्याने इस्राएली लोकांच्या गोत्राच्या भागानुसार प्रदेशाची वाटणी करून दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या; त्या ठिकाणी यहोशवाने इस्राएल लोकांना त्यांच्या-त्यांच्या वतनभागांप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग यहोशवाने त्यांच्यासाठी शिलोमध्ये परमेश्वरासमोर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या; असा यहोशवाने तेथे तो देश इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या त्यांच्या वतन भागाप्रमाणे वाटून दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 18:10
24 Iomraidhean Croise  

कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते.


आता लोकांचे अधिकारी यरुशलेममध्ये स्थायिक झाले. बाकीच्या लोकातील दहापैकी एकाने यरुशलेम, पवित्र नगरीत येऊन राहावे म्हणून चिठ्ठ्या टाकून त्यांची निवड करण्यात आली, व उरलेल्या नऊ लोकांनी स्वतःच्या नगरात राहावे.


ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात, हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. सेला


कारण परमेश्वरा, मी तुम्हाला केलेला नवस तुम्ही ऐकला आहे आणि तुमच्या नावाचे भय धरणार्‍यांचे वतन तुम्ही मला दिले आहेत.


नाणेफेक करून भांडण मिटवता येते, आणि प्रबळ प्रतिस्पर्ध्यांला दूर ठेवता येते.


“ ‘शिलोह नगरात जा, जिथे मी सर्वप्रथम माझ्या नावाचे निवासस्थान केले, आणि माझ्या इस्राएली लोकांच्या दुष्टाईमुळे मी काय केले ते पाहा.


तुम्ही तो तुमच्यासाठी व तुमच्यात राहणार्‍या विदेशी लोकांमध्ये व ज्यांना लेकरे आहेत, त्यांच्यासाठी वतन म्हणून वाटायचे आहे. तुम्ही त्यांना देशात जन्मलेल्या इस्राएली लोकांप्रमाणेच समजले पाहिजे; तुमच्याबरोबर त्यांनाही इस्राएलच्या गोत्रांमध्ये वतन वाटून द्यावे.


“हा देश तू इस्राएलच्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून द्यावे, आणि हे त्यांचे भाग असतील,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


म्हणून याहवेहच्या सभेत चिठ्ठ्या टाकून सूत्राने जमिनीची वाटणी करण्यास तुमच्याकडे कोणी राहणार नाही.


याहवेह मोशेला म्हणाले,


येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर त्यांची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.


आपण त्याला सर्व लोकांवर अधिकार दिला आहे, ते यास्तव की ज्यांना तुम्ही त्याच्याकडे सोपविले आहे, त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे.


त्यांनी कनानातील सात राष्ट्रांना उलथवून टाकले व त्यांची भूमी वतन म्हणून त्यांच्या लोकांना दिली.


यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’


त्या पित्याचे आभार मानणारे व्हा, ज्यांनी प्रकाशाच्या राज्यामध्ये असलेल्या पवित्र लोकांच्या वतनामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला पात्र ठरविले आहे.


याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार साडेनऊ गोत्रांना चिठ्ठ्या टाकून वतन वाटण्यात आले होते.


याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी देशाची वाटणी केली.


बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार पहिली चिठ्ठी निघाली. त्यांच्या वाट्याला आलेला भाग यहूदाह आणि योसेफाच्या गोत्रातील प्रांतांच्या दरम्यान होता.


त्या सात प्रदेशांचे वर्णन लिहिल्यावर ते तुम्ही माझ्याकडे आणावे, मग याहवेह आपल्या परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.


जेव्हा ते पुरुष प्रदेशाची मोजणी करण्यासाठी निघाले, तेव्हा यहोशुआने त्यांना सूचना दिली, “जा आणि त्या प्रदेशाचे सर्वेक्षण करा आणि त्याचे वर्णन लिहा आणि परत माझ्याकडे या, मग मी येथे शिलोहमध्ये याहवेहसमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकेन.”


तेव्हा ते पुरुष निघाले आणि त्या प्रदेशातून फिरले व प्रत्येक नगरांप्रमाणे सात भागात त्याचे वर्णन एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहिले आणि शिलोह येथील छावणीत यहोशुआकडे परत आले.


या वतनसीमा एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुळांच्या पुढार्‍यांनी शिलोह येथे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात याहवेहच्या उपस्थितीत नेमून दिली. अशाप्रकारे त्यांनी देशाची वाटणी करण्याचे काम संपविले.


आठवण करा, कशाप्रकारे यार्देनपासून पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत या उर्वरित राष्ट्रांना मी जिंकले व ती तुमच्या गोत्रांना तुमचे वतन म्हणून वाटून दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan