Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 17:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मनश्शेहच्या गोत्राची सीमा आशेरापासून शेखेमाच्या पूर्वेस मिकमथाथपर्यंत जाते. तिथून ही सीमा दक्षिणेला एन-तप्पूआहच्या लोकांच्या वस्तीपर्यंत जाऊन पोहोचते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मनश्शेची सीमा आशेराहून शखेमाच्या पूर्वेकडील मिखमथाथापर्यंत जाते; व पुढे ती दक्षिणेस एन-तप्पूहाच्या लोकवस्तीपर्यंत जाऊन पोहचते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि मनश्शेची सीमा आशेरापासून शखेमाच्या समोरल्या मिखमथाथा नगरापर्यंत झाली, आणि ती सीमा एन-तप्पूहाच्या लोकवस्तीच्या उजव्या भागापर्यंत पोहचते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 17:7
15 Iomraidhean Croise  

तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा पुत्र शेखेम, याने तिला पाहिले, तेव्हा तो तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून त्याने तिला भ्रष्ट केले.


योसेफाचे भाऊ आपल्या वडिलांची मेंढरे शेखेम येथे चारावयास घेऊन गेले होते.


याकोबाने योसेफास म्हटले, “तू शेखेमला जा आणि तुझ्या भावांचे सर्वकाही ठीक आहे का व कळपांची स्थिती कशी आहे, हे पाहून मला येऊन सांग.” नंतर याकोबाने त्याला हेब्रोन खोर्‍यातून पाठवले. आणि तो शेखेमास पोहोचला.


रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले.


तेव्हा यरोबोअमने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम शहर बांधले व तिथे राहिला. तिथून पुढे त्याने पेनुएल बांधले.


एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर शेखेम (शरणपूर) व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,


परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली: “मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन, आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.


कारण मनश्शेहच्या गोत्रातील कन्यांना पुत्रांमध्ये वतन मिळाले. गिलआदाचा प्रदेश मनश्शेहच्या बाकीच्या वंशजाचा झाला होता.


(मनश्शेहकडे तप्पूआहचा प्रांत होता, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाच्या सीमेवरील तप्पूआह एफ्राईमकडे होते.)


तेव्हा त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातील केदेश; एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम; आणि यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) ही वेगळी केली.


एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्यांना दिलेली नगरे ही: शेखेम (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) आणि गेजेर,


नंतर यहोशुआने इस्राएलांच्या सर्व गोत्रांना शेखेम येथे एकत्र केले. त्याने इस्राएलचे वडीलजन, पुढारी, न्यायाधीश व सर्व अधिकाऱ्यांना बोलाविले आणि त्या सर्वांनी स्वतःस परमेश्वरासमोर सादर केले.


योसेफाच्या ज्या अस्थी इस्राएली लोकांनी इजिप्त येथून आणल्या होत्या, त्या शेखेम येथे जी जागा याकोबाने हमोराच्या पुत्रांकडून चांदीच्या शंभर नाण्यांस विकत घेतलेली होती तिथे पुरल्या. हे योसेफाच्या वंशजांचे वतन झाले.


यरूब्बआलचा पुत्र अबीमेलेख हा आपल्या आईच्या भावांना भेटण्यासाठी शेखेम येथे गेला आणि त्यांना व आपल्या आईच्या सर्व घराण्याला तो बोलला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan