Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 17:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 योसेफाच्या लोकांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हाला पुरेसा नाही आणि बेथ-शान व सभोवतालच्या वस्तीत राहणारे व येज्रील खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेव्हा योसेफाचे वंशज म्हणाले, “हा डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; बेथ-शान खोर्‍यातील व त्याच्या उपनगरांत आणि इज्रेल खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 नंतर योसेफाच्या वंशजांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; आणि जे कनानी तळप्रांतात राहतात, त्या सर्वांना लोखंडी रथ आहेत; म्हणजे बेथ-शान व तिजकडली खेडी यांतले, आणि इज्रेल खोरे जे, त्यामध्ये आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 17:16
20 Iomraidhean Croise  

थोड्याच वेळात, आकाश काळ्या ढगांनी भरले, वारा वाहू लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अहाब रथात बसून येज्रील येथे निघाला.


याहवेहचे सामर्थ्य एलीयाहवर आले आणि तो आपली कंबर बांधून अहाबापुढे येज्रीलपर्यंत धावत गेला.


काही काळानंतर, येज्रीली नाबोथच्या द्राक्षमळ्यासंबंधी एक घटना घडली, हा द्राक्षमळा अहाब राजाच्या शोमरोनातील येज्रील राजवाड्याजवळ होता.


“आणि ईजबेलविषयी याहवेह म्हणतात: ‘येज्रीलच्या भिंतीजवळ ईजबेलला कुत्रे खातील.’


अहीलुदचा पुत्र बाअना याच्याकडे तानख व मगिद्दो आणि येज्रीलखाली असलेल्या सारेथान जवळील बेथ-शानपर्यंत सर्व प्रदेश, तसेच बेथ-शानपासून योकमेअम पर्यंतचा आबेल-महोलाहचा प्रदेश;


ईजबेलला येज्रीलच्या भूमीत कुत्री फाडून खातील आणि तिला कोणीही मूठमाती देणार नाही.’ ” मग त्या तरुणाने दार उघडले आणि पळाला.


आणि ईजबेलचे शरीर येज्रीलातील शेतात खताप्रमाणे विखुरले जाईल. हे कोणालाही सांगता येणार नाही की, ही ईजबेल आहे.”


याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, ते नासाडीचा ढिगारा होईल, आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” असे याहवेह म्हणतात.


येज्रील, योकदेआम, जानोहा,


इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ होते).


तेव्हा यहोशुआने उत्तर दिले, “जर तुम्ही संख्येने पुष्कळ आहात आणि एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश तुमच्यासाठी खूप लहान आहे, तर परिज्जी व रेफाईम लोक राहतात तो रानाचा प्रदेश तुमच्यासाठी मोकळा करून घ्या.”


परंतु यहोशुआ योसेफाच्या गोत्राचे एफ्राईम आणि मनश्शेहला म्हणाला; “तुम्ही संख्येने पुष्कळ आणि बलवान आहात. तुम्हाला केवळ एकच भाग नसावा


परंतु अरण्यातील डोंगराळ भाग व त्याच्या टोकापर्यंतच्या हद्दी तुमच्या होतील; जरी कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत आणि ते फार शक्तिशाली आहेत, तरीही तुम्ही त्यांना घालवून देऊ शकाल.”


त्यांच्या सीमेमध्ये या नगरांचा समावेश होता: येज्रील, कसुल्लोथ, शूनेम,


याहवेह यहूदाहच्या लोकांसह होते. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील देशांचा पूर्णपणे ताबा घेतला, परंतु खोर्‍यात राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना ते हाकलू शकले नाहीत.


तेव्हा सिसेराने आपले सर्व लोक आणि आपले नऊशे लोखंडी रथ सज्ज करून, हरोशेथ-हग्गोईम येथून किशोन नदीकडे कूच केले.


त्याच्याजवळ नऊशे लोखंडी रथ होते आणि त्याने क्रूरतेने वीस वर्षे इस्राएली लोकांचा छळ केला, त्यांनी मदतीसाठी याहवेहचा धावा केला.


त्यानंतर लवकरच मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील शेजारी राष्ट्रांची सैन्ये एकत्रित झाली. त्यांनी यार्देन पार केली व येज्रीलच्या खोर्‍यात तळ दिला.


पलिष्ट्यांनी त्यांचे सर्व सैन्य अफेक येथे जमविले आणि इस्राएली सैन्याने त्यांची छावणी येज्रीलच्या झर्‍याजवळ दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan