Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तिथून ती सीमा त्या डोंगराच्या माथ्यापासून नेफतोआहच्या झर्‍यापर्यंत आणि तिथून एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून बालाह म्हणजेच किर्याथ-यआरीमपर्यंत पोहोचते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झर्‍यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून तेथून बाला उर्फ किर्याथ-यारीम येथपर्यंत पोहचते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:9
8 Iomraidhean Croise  

दावीद व त्याची सर्व माणसे, यहूदीयातील बालाह येथून परमेश्वराचा कोश जो सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांमध्ये आरूढ आहेत त्यांच्या नावाने ओळखला जात असे, तो कोश आणण्यासाठी निघाले.


दावीद व इस्राएलचे सर्व लोक यहूदीयातील बालाह म्हणजे किर्याथ-यआरीम येथे करुबांमध्ये आरूढ असलेला, जो त्या नावाने संबोधित केला जातो, तो याहवेह परमेश्वराचा कोश आणण्यासाठी निघाले.


बालाह, ईयीम, असेम,


किर्याथ-बआल (म्हणजेच किर्याथ-यआरीम व राब्बाह) अशी दोन नगरे आणि त्यांची गावे.


दक्षिणेकडील सीमा किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) नगराच्या बाहेरील बाजूपासून सुरू झाली व ती नेफतोआहच्या झर्‍याकडे पोहोचली.


तेव्हा इस्राएली लोक बाहेर पडले आणि तिसर्‍या दिवशी ते त्यांच्या शहरांकडे आले: गिबोन, कफीराह, बैरोथ आणि किर्याथ-यआरीम ही त्या शहरांची नावे.


त्यांनी जाताना यहूदीयातील किर्याथ-यआरीम जवळ तळ दिला, यामुळे या ठिकाणाला आज देखील “महाने-दान” असेच म्हणतात.


तेव्हा त्यांनी किर्याथ-यआरीमच्या लोकांकडे हा संदेश देत दूत पाठविले, “पलिष्ट्यांनी याहवेहचा कोश परत केला आहे. इकडे या आणि तो तुमच्या नगराकडे घेऊन जा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan