Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तिथून ती सीमा आखोर खोर्‍यापासून दबीरपर्यंत जाऊन गिलगालच्या उत्तरेकडे वळली. हे गिलगाल खोर्‍याच्या दक्षिण बाजूस असलेल्या अदुमिम्माच्या चढावांच्या समोरील बाजूस आहे. तिथून त्या सीमेचा विस्तार एन-शेमेशच्या झर्‍यांपासून एन-रोगेलपर्यंत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेथून ती सीमा आखोर खोर्‍यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालाकडे वळली आहे; हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढावासमोर नदीच्या दक्षिणेस आहे. मग ती सीमा एन-शेमेश नावाच्या झर्‍याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:7
13 Iomraidhean Croise  

आपण शहरात जाताना कोणी पाहून धोका देऊ नये, म्हणून योनाथान आणि अहीमाज एन-रोगेल येथे राहत होते. त्यांनी ही सूचना दावीद राजाला द्यावी म्हणून त्यांच्याकडे एक दासी पाठवली गेली.


अदोनियाहने एन-रोगेलजवळ जोहेलेथच्या दगडावर मेंढरे, गुरे आणि पुष्ट वासरे यांचा यज्ञ केला. त्याने आपले सर्व भाऊ, राजपुत्र आणि यहूदीयाच्या सर्व राजकीय अधिकार्‍यांना आमंत्रित केले,


माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल.


कारण त्यांची आई अविश्वासू आहे आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन, जे मला माझे अन्न आणि माझे पाणी, माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’


मग यहोशुआ सर्व इस्राएली लोकांसह गिलगालच्या छावणीकडे परतला.


तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्‍या लोकांवर हल्ला केला.


व पुढे बेथ-होगलाहपर्यंत चढून बेथ-अराबाहच्या उत्तरेकडे रऊबेनाचा पुत्र बोहनच्या खडकापर्यंत गेली.


मग ती सीमा उत्तरेस वळून एन-शेमेशकडे जाऊन पुढे गलीलोथ जे अदुमिम्माच्या उतरणीच्या समोर होते तिथे गेली. नंतर तिथून ती खाली रऊबेनाचा पुत्र बोहन याच्या खडकाकडे जाते.


पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी ते यार्देनेतून वर आले आणि यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे त्यांनी छावणी घातली.


मग यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी जेरहाचा पुत्र आखान व त्याच्याबरोबर, ती चांदी, तो झगा, ती सोन्याची लगड, त्याचे पुत्र, त्याच्या कन्या, त्याचे बैल, गाढवे, मेंढरे, त्याचा तंबू आणि त्याचे जे काही होते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले.


आणि आखानावर दगडांची एक मोठी रास केली, जी आज देखील तिथे आहे. तेव्हा याहवेहचा कोप शांत झाला आणि तेव्हापासून त्या ठिकाणाला अखोरचे खोरे असे म्हटले जाते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan