Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तिथून ती एक्रोनच्या उत्तरेकडून शिक्रोनपर्यंत गेली व बालाह पर्वतावरून यबनेलास जाऊन पोहोचली. सीमेचा शेवट भूमध्य समुद्राजवळ झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेलास निघाली आहे; ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:11
15 Iomraidhean Croise  

एलीयाहने राजाला सांगितले, याहवेह हे म्हणतात: “इस्राएलात परमेश्वर नाही म्हणून, तू एक्रोनच्या बाल-जबूब दैवताला प्रश्न विचारण्यास दूत पाठविले होते काय? हे कृत्य केल्यामुळे तू या दुखण्यातून उठणार नाहीस; यातच तुला खात्रीने मरण येईल.”


त्यांनी उत्तर दिले, “वाटेत आम्हाला एक मनुष्य भेटण्यास आला, तो म्हणाला, ‘ज्या राजाने तुम्हाला पाठविले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, “याहवेहचा हा संदेश आहे: इस्राएलात परमेश्वर नाही म्हणून, तू एक्रोनच्या बाल-जबूब दैवताला प्रश्न विचारतोस? म्हणून तू ज्या अंथरुणावर पडून आहेस, त्या अंथरुणावरून उठणार नाहीस. तू खात्रीने मरशील!” ’ ”


तो पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करण्यास गेला आणि त्याने गथ, याबनेह आणि अश्दोद यांच्या भिंती पाडल्या. त्यानंतर त्याने अश्दोदजवळ आणि पलिष्ट्यांमध्ये इतर ठिकाणी शहरांची पुनर्बांधणी केली.


तुमची पश्चिमेकडील सीमा भूमध्य समुद्राचा किनारा असेल. ही तुमची पश्चिम सीमा असावी.


तिथून ती बालाहाच्या पश्चिमेस वळसा घेऊन सेईर पर्वताकडे गेली आणि यआरीम म्हणजेच कसालोन डोंगराच्या उत्तरेस जाऊन बेथ-शेमेश इथे उतरून तिम्नाहास जाऊन पोहोचते.


भूमध्य समुद्राचा किनारा ही पश्चिमेची सीमा होती. यहूदाह कुळातील लोकांच्या त्यांच्या वंशानुसार हा प्रदेश मिळाला.


एक्रोन व सभोवतालच्या वस्त्या व गावे.


तिथून ती सीमा त्या डोंगराच्या माथ्यापासून नेफतोआहच्या झर्‍यापर्यंत आणि तिथून एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून बालाह म्हणजेच किर्याथ-यआरीमपर्यंत पोहोचते.


यहूदाहने गाझा, अष्कलोन आणि एक्रोन ही—शहरे व त्यांच्या सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला.


तेव्हा इस्राएली व यहूदीयाच्या सैनिकांनी उठून आरोळी केली, त्यांनी गथ व एक्रोनच्या वेशींपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग केला. मरण पावलेले पलिष्टी शाराईमाच्या वाटेवर गथ व एक्रोन येथवर पडलेले होते.


म्हणून त्यांनी परमेश्वराचा कोश एक्रोन येथे पाठविला. परमेश्वराचा कोश एक्रोनमध्ये प्रवेश करताच एक्रोनचे लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “आम्हाला आणि आमच्या लोकांनी मारावे म्हणून त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश आमच्याकडे आणला आहे.”


तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” त्यांनी उत्तर दिले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश गथकडे घेऊन जा.” तेव्हा त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश तिथून हालविला.


एक्रोनपासून गथपर्यंत पलिष्ट्यांनी जी नगरे इस्राएलपासून ताब्यात घेतली होती ती इस्राएली लोकांस परत मिळाली आणि इस्राएली लोकांनी आसपासच्या प्रदेश सोडवून घेतला. व इस्राएली व अमोरी लोकात शांतता होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan