Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तिथून ती बालाहाच्या पश्चिमेस वळसा घेऊन सेईर पर्वताकडे गेली आणि यआरीम म्हणजेच कसालोन डोंगराच्या उत्तरेस जाऊन बेथ-शेमेश इथे उतरून तिम्नाहास जाऊन पोहोचते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेथून ती सीमा बालापासून पश्‍चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ-शेमेश येथे उतरते व तशीच तिम्नाकडे निघते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:10
12 Iomraidhean Croise  

दावीद व त्याची सर्व माणसे, यहूदीयातील बालाह येथून परमेश्वराचा कोश जो सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांमध्ये आरूढ आहेत त्यांच्या नावाने ओळखला जात असे, तो कोश आणण्यासाठी निघाले.


परंतु अमस्याहने ऐकले नाही, तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआशने हल्ला केला. त्याने आणि यहूदीयाच्या राजा अमस्याहने यहूदीयातील बेथ-शेमेश येथे एकमेकांचा सामना केला.


त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली.


तिथून ती एक्रोनच्या उत्तरेकडून शिक्रोनपर्यंत गेली व बालाह पर्वतावरून यबनेलास जाऊन पोहोचली. सीमेचा शेवट भूमध्य समुद्राजवळ झाला.


काईन, गिबियाह, तिम्नाह अशी दहा नगरे आणि त्यांची गावे.


इरोन, मिगदल-एल, होरेम, बेथ-अनाथ, व बेथ-शेमेश ही होती. ही सर्व एकोणवीस नगरे आणि त्यांची गावे होती.


एईन, युत्ताह आणि बेथ-शेमेश व त्यांची कुरणे, ही एकूण नऊ नगरे या दोन गोत्रांकडून दिली.


शमशोन खाली तिम्नाह येथे गेला आणि तिथे त्याने एक सुंदर पलिष्टी स्त्री पाहिली.


शमशोन त्यांच्या आईवडिलांसोबत खाली तिम्नाह येथे गेला. ते तिम्नाह येथील द्राक्षांच्या मळ्यांजवळ पोहोचले असता, अचानक एक तरुण सिंह गर्जना करीत त्याच्या अंगावर आला.


परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan