Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 14:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 म्हणून त्या दिवशी याहवेहने हा डोंगराळ प्रदेश मला देण्याचे अभिवचन दिले होते, तो तू मला दे. तुला तर माहीतच आहे की, तिथे अनाकी लोक राहतात आणि त्यांची शहरे मोठी व तटबंदीची आहेत, परंतु याहवेह जर माझ्याबरोबर असतील, तर मी त्या लोकांना घालवून देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तेव्हा परमेश्वराने त्या वेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे; तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तर परमेश्वराने त्यादिवशी ज्या डोंगराळ प्रदेशाविषयी सांगितले, तो हा आता मला दे; कारण त्यादिवशी तू ऐकले होते की, तेथे अनाकी लोक आणि मोठी तटबंदीची नगरे आहेत; तरी परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना वतनातून बाहेर घालवीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 14:12
21 Iomraidhean Croise  

कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे सर्व शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”


तेव्हा आसाने त्याचे परमेश्वर याहवेहना हाक मारली आणि म्हणाला, “याहवेह, दुर्बल लोकांना पराक्रमी लोकांविरुद्ध मदत करणारे तुमच्यासारखे कोणी नाही. आमच्या परमेश्वरा, याहवेह आम्हाला मदत करा, कारण आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत आणि तुमच्याच नावामध्ये आम्ही या विशाल सैन्याविरुद्ध आलो आहोत. याहवेह, तुम्ही आमचे परमेश्वर आहात; मर्त्य मानवांनी तुमच्यावर विजयी होऊ नये.”


त्यांच्या तलवारीने त्यांनी हा देश जिंकला नाही, आणि त्यांच्या बाहुबलाने त्यांना विजयी केले असेही नाही; हे तुमच्या उजव्या हाताने, तुमच्या भुजांनी आणि तुमच्या मुखप्रकाशाने हे केले, कारण तुम्ही त्यांच्यावर प्रीती केली.


परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे, आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.


परंतु तिथे राहत असलेले लोक बलवान आहेत, त्यांची शहरे तटबंदीची व पुष्कळ मोठी आहेत. आम्ही त्या ठिकाणी अनाकाचे वंशजही पाहिले.


तिथे आम्ही नेफिलीम (अनाकाचे महाबलाढ्य वंशज नेफिलीम पासून आहेत) लोकांना बघितले. आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच भासलो.”


याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.”


अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल?


आम्ही आता कुठे जावे? आमच्या हेरबंधूंच्या वार्तेमुळे आम्ही भयभीत झालो आहोत. ते म्हणतात की, ‘त्या देशातील लोक आपल्यापेक्षा धिप्पाड आणि बलवान आहेत. त्यांची नगरे खूप मोठी असून नगरतट तर इतके उंच आहेत की ते जणू काही आकाशाला भिडले आहेत. आम्ही तिथे अनाकाचे वंशज देखील पाहिले आहेत.’ ”


हे इस्राएला, ऐक: तुम्ही आता यार्देन पार करून पलीकडे आत जाणार आहात आणि ज्यांच्या शहरांची तटबंदी आकाशापर्यंत आहेत, अशा तुमच्यापेक्षा महान आणि अधिक बलवान लोकांना हाकलून देणार आहात.


पण तुमची खात्री असू द्या की, याहवेह तुमचे परमेश्वर भस्म करणार्‍या अग्निरुपाने तुमच्यापुढे जातील. ते त्यांचा नाश करतील; त्यांना तुमच्यापुढे नमवतील आणि तुमच्यासमोर त्यांचा नायनाट करतील, मग याहवेहने दिलेल्या अभिवचनानुसार तुम्ही त्यांना लगेच संपूर्ण नष्ट कराल आणि त्यांना तिथून घालवून द्याल.


जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.


विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली;


अनाकाचे पुत्र शेशय, अहीमान व तलमय या अनाकांच्या वंशजांना कालेबाने बाहेर घालवून दिले.


मोशेने अभिवचन दिल्याप्रमाणे कालेबला हेब्रोन देण्यात आले, ज्याने अनाकाच्या तीन पुत्रांना हाकलून लावले.


योनाथान त्याच्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंती लोकांच्या चौकीकडे जाऊ या. कदाचित याहवेह आपल्या बाजूने कार्य करतील, कारण याहवेहने आमचे तारण करू नये म्हणून त्यांना कोण अडखळविणार? मग ते पुष्कळांद्वारे असो किंवा थोडक्यांद्वारे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan