Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 13:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते; अव्वी लोकांचा प्रदेश:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 (मिसर देशाच्या पूर्वेकडील शीहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो; त्यात पलिष्ट्यांचे पाच सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन);

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मिसराच्या पूर्वेस जी शीहोर नदी तिजपासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंत ही जो देश, तो कनान्यांचा मानलेला आहे; गज्जी व अश्दोदी, अष्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी पाच सुभेदार आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 13:3
18 Iomraidhean Croise  

हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान.


त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, “मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश—


तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर त्यावेळी सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे रहिवासी आले होते. त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वरापुढे सात दिवस व आणखी सात दिवस असे मिळून चौदा दिवस उत्सव साजरा केला.


मग दावीदाने परमेश्वराचा कोश किर्याथ-यआरीमहून आणण्याच्या वेळी इजिप्तच्या शिहोर नदीपासून ते लबो हमाथपर्यंत सर्वत्र विखुरलेल्या इस्राएली लोकांना एकत्र केले.


प्रचंड जलाशयावरून शिहोरचे धान्य आले; नाईल नदीकाठापासून कापणी केलेले पीक हे सोरचे उत्पन्न होते, आणि ती राष्ट्रांची बाजारपेठ झाली.


आता इजिप्तकडे कशाला जाता नील नदीचे पाणी पिण्यासाठी काय? आणि अश्शूराकडे का जावे फरात नदीचे पाणी पिण्यासाठी काय?


गाझा शहरापर्यंत विखुरलेल्या गावातून वस्ती करून राहिलेल्या अव्वी लोकांवर कफतोरहून आलेल्या कफतोरी लोकांनी हल्ला चढवून त्यांचा संहार केला व त्या ठिकाणी वस्ती केली.)


परंतु इस्राएली लोकांनी गशूरी व माकाथी लोकांना घालवून दिले नव्हते, म्हणून आज देखील ते लोक इस्राएली लोकात राहत आहेत.


पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे गेले व म्हणाले, “काहीतरी युक्ती कर आणि त्याच्या बळाचे रहस्य काय आहे आणि त्याच्यावर प्रबल होऊन, त्याला बांधून आपल्याला वश कसे करावे हे विचार. आम्ही प्रत्येकजण तुला चांदीची अकराशे शेकेल देऊ.”


ते लोक हे होते, पलिष्टांचे पाच शासक, कनानी, सीदोनी, व बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.


परमेश्वराचा कोश पलिष्टी सैन्याने हस्तगत केल्यानंतर त्यांनी तो एबेन-एजर येथून अश्दोदकडे नेला.


म्हणून त्यांनी परमेश्वराचा कोश एक्रोन येथे पाठविला. परमेश्वराचा कोश एक्रोनमध्ये प्रवेश करताच एक्रोनचे लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “आम्हाला आणि आमच्या लोकांनी मारावे म्हणून त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश आमच्याकडे आणला आहे.”


तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” त्यांनी उत्तर दिले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश गथकडे घेऊन जा.” तेव्हा त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश तिथून हालविला.


पलिष्ट्यांनी विचारले, “जे दोषार्पण आम्ही त्यांच्याकडे पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्टी अधिकार्‍यांच्या संख्येप्रमाणे पीडेच्या गाठींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हाला व तुमच्या अधिकार्‍यांना त्याच पीडांनी पीडले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan