Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 13:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 गिलआदातील सर्व नगरे आणि राब्बाह जवळील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा देश, ही याजेरची सीमा होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्यांचा मुलुख म्हणजे याजेर, गिलादातली सर्व नगरे आणि राब्बाच्या पूर्वेकडील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा प्रदेश.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 आणि त्यांची सीमा याजेर व गिलादातली सर्व नगरे व अम्मोन्यांच्या संतानांचा अर्धा देश, राब्बा यांच्यापुढे जे अरोएर तेथपर्यंत झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 13:25
21 Iomraidhean Croise  

त्याकाळी वसंतॠतूमध्ये राजे लोक युद्धावर जात असत, तेव्हा दावीदाने राजाची माणसे आणि संपूर्ण इस्राएली सैन्याबरोबर योआबाला पाठवले. त्यांनी अम्मोनी सैन्याचा नाश केला आणि राब्बाह शहराला वेढा घातला. परंतु दावीद यरुशलेमात राहिला.


त्या कालांतरात योआबाने अम्मोन्यांचा राब्बाह नगर याच्याविरुद्ध लढाई केली आणि राजदूर्ग ताब्यात घेतले.


यार्देन पार केल्यावर, त्यांनी अरोएर नगराच्या दक्षिणेकडील खोर्‍यात डेरा दिला, नंतर ते गादमधून जाऊन याजेरकडे गेले.


हेब्रोन्यातील यरीयाह हा त्यांच्या वंशावळीच्या नोंदीनुसार त्यांचा कुटुंबप्रमुख होता. (दावीद राजाच्या शासनकाळात चाळिसाव्या वर्षी शिरगणतीत शोध घेण्यात आला. गिलआदामधील हिब्रोनी याजेरमध्ये सक्षम पुरुष आढळून आले.


हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.


हेशबोनची शेते सुकून गेली आहेत, सिबमाहच्या द्राक्षवेलीसुद्धा. ज्या एकवेळी याजेरपर्यंत पोहोचल्या होत्या आणि वाळवंटाकडे पसरत गेल्या होत्या, त्या खास निवडलेल्या द्राक्षवेली इतर देशांच्या राज्यकर्त्यांनी तुडवून टाकल्या आहेत. त्यांची कोंबे बाहेर पसरली आणि ती समुद्रापर्यंत गेली आहेत.


अरोएरची शहरे ओसाड होतील आणि ते कळपांना विश्रांती घेण्यासाठी सोडले जाईल, तिथे त्यांना घाबरविणारा कोणीही नसेल.


जसे याजेर शोक करतो, तसे मी सिबमाहच्या द्राक्षलतांसाठी शोक करतो. तुमच्या फांद्या समुद्रापर्यंत पसरलेल्या आहेत, त्या याजेरपर्यंत पोहोचतात; संहार करणाऱ्याने तुमच्या पिकलेल्या फळांवर व द्राक्षांवर हल्ला केला आहे.


अम्मोन्यांच्या राब्बाहविरुद्ध येणार्‍या तलवारीसाठी एक वाट आणि यहूदाह व तटबंदीच्या यरुशलेमच्या विरुद्ध येणार्‍या तलवारीसाठी दुसरी वाट आखून ठेव.


म्हणून मी राब्बाहच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि त्यामुळे त्यांचे किल्ले व राजमहाल भस्म होतील. महान वादळामध्ये वावटळीचा आवाज व्हावा तसा भयानक रणगर्जना होतील;


मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले.


अटरोथ-शोफान, याजेर, योगबेहाह,


जेव्हा तुम्ही अम्मोनी लोकांच्या भूमीत प्रवेश कराल, अम्मोनी लोकांना त्रास देऊ नका, कारण मी त्यांचा कोणताही प्रदेश तुम्हाला देणार नाही, तो सर्व मी लोटाच्या वंशजांना वतनादाखल दिला आहे.”


(रेफाईम लोकांपैकी बाशानचा राजा ओग हा शेवटचा होता. त्याचा पलंग लोखंडाने सजविला होता आणि तो चार हात लांब आणि दोन हात रुंद होता. तो अजूनही अम्मोनी लोकांच्या राब्बाहमध्ये आहे.)


आणि गिलआद देश, गशूरी व माकाथी या लोकांचा सर्व प्रदेश; सर्व हर्मोन पर्वत; सलेकाहपर्यंत सर्व बाशान;


मोशेने गाद गोत्रास त्यांच्या कुळानुसार हे वतन दिले:


आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पेह व बेटोनीमपर्यंत आणि महनाईमपासून दबीरच्या सीमेपर्यंत;


हेशबोन व याजेर ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.


गिलआद यार्देनेपलीकडे राहिला, पण दान आपल्या जहाजांपाशीच का राहिला? आशेर सागरकिनारीच राहिला आणि खाडीतील त्याच्या सुरक्षित स्थळी राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan