Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 12:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन. त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्‍याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्‍याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अमोर्‍यांचा हेशबोननिवासी राजा सीहोन; आर्णोन खोर्‍याच्या कडेवरल्या अरोएर नगरापासून व त्याच खोर्‍याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गिलादावर,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएरपासून अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 12:2
12 Iomraidhean Croise  

परंतु त्या रात्रीच याकोब उठला आणि त्याने त्याच्या दोन्ही पत्नी व उपपत्नी आणि अकरा मुले यांना जागे केले आणि यार्देन नदीच्या किनार्‍याने त्यांना यब्बोक नदीच्या उताराने पार नेले


बेलाचा पिता आजाजचा पिता शमा व त्याचा पिता योएल. हा वंश नबो व बआल-मेओन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला.


“नंतर राज्ये व राष्ट्रे तुम्ही त्यांना दिली आणि दूरवरच्या कानाकोपर्‍यातील सरहद्दीही दिल्या. त्यांनी हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओगचे देश काबीज केले.


अमोरी लोकांचा राजा सीहोन, बाशानचा राजा ओग आणि कनानाच्या सर्व राजाचा त्यांनी वध केला.


अरोएरवासी जनहो, तटस्थ होऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा, आणि पळ काढणार्‍या पुरुषांना व बचाव करून निघणाऱ्या स्त्रियांना विचारा, ‘तिथे काय घडले?’


हे मोशेने जाहीर करण्यापूर्वीच अमोर्‍यांचा राजा सीहोनाचा हेशबोन येथे पराभव करण्यात आला होता व एद्रेई जवळील अष्टारोथ येथे बाशानचा राजा ओगचाही पराभव करण्यात आला होता.


अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या दूतांना उत्तर दिले, “जेव्हा इस्राएली लोक इजिप्त देशामधून बाहेर आले, तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक आणि यार्देन या नद्यांपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी हिरावून घेतला होता. आता तो शांततेने परत केला जावा.”


आर्णोन ते यब्बोकपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देनपर्यंत अमोर्‍यांचा सर्व प्रदेश काबीज केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan