Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 12:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ज्या राजांना ठार मारून त्यांचे यार्देनेपलीकडे उगवतीकडील आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेले प्रदेश आणि पूर्वेकडील सर्व इस्राएल लोकांनी काबीज केले ते राजे हे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यार्देन नदीच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, आर्णोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून काबीज केला, त्याच्या राजांची नावे ही आहेत:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 12:1
24 Iomraidhean Croise  

उरीचा पुत्र गेबेर हा गिलआद प्रांतावर (अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांचा प्रदेश). त्या जिल्ह्यावर तो एकटाच अधिकारी होता.


हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्‍या हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे. कारण हे ते स्थान आहे, ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.


आणि त्यांची भूमी इस्राएलला कायमचे वतन म्हणून, त्यांची करुणा सनातन आहे.


उत्तर आणि दक्षिण दिशा तुम्हीच निर्माण केल्या; ताबोर व हर्मोन पर्वत तुमच्या नामाचा आनंदाने गजर करतात.


घरट्यातून ढकलून दिलेल्या फडफडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, मोआबच्या स्त्रिया आर्णोनच्या घाटावर आहेत.


नंतर तिथून निघून, अमोर्‍यांच्या रानातील सीमेतून निघणाऱ्या आर्णोन नदीजवळ त्यांनी तळ दिला. आर्णोन नदी मोआबाची सीमा आहे, जी मोआब आणि अमोरी यांच्यामध्ये आहे.


इस्राएलने अमोर्‍यांचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले:


परंतु इस्राएलने त्याला तलवारीवर धरले आणि आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंत, अम्मोनी लोक राहतात तिथपर्यंत त्यांच्या देशावर कब्जा केला, कारण त्यांची सीमा तटबंदची होती.


यार्देन नदीच्या पलीकडे त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही वतन घेणार नाही, कारण आमचे वतन आम्हाला यार्देनेच्या पूर्वेस मिळाले आहे.”


आम्ही हत्यारबंद होऊन याहवेहपुढे कनान देशात पार जाऊ, परंतु आमचे वतन यार्देनेच्या अलीकडे असणार.”


तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्‍यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली.


“आता उठा आणि आर्णोन नदी ओलांडून जा. पाहा, हेशबोनचा राजा अमोरी सीहोन आणि त्याचा देश मी तुमच्या हाती दिला आहे. तो देश ताब्यात घेण्यास सुरुवात करा व त्याच्याशी युद्ध करा.


सीहोन आणि त्याची सर्व सेना आमच्यासोबत युद्ध करण्यास याहस येथे एकत्रित झाली,


मग आम्ही वळलो आणि बाशानाच्या वाटेने वर गेलो आणि बाशानचा राजा ओग आपले सर्व सैन्य जमवून आमच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे आला.


मोशेने इस्राएली लोकांना दिलेले नियमशास्त्र हे आहे.


आणि तेव्हा ते यार्देनेच्या पूर्वेकडे बेथ-पौर शहराजवळ तळ देऊन राहिलेले होते, हीच भूमी पूर्वी अमोर्‍यांनी आपला राजा सीहोनच्या अधिपत्याखाली व्यापली होती आणि त्याची राजधानी हेशबोन होती; मोशे व इस्राएली लोकांनी इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर सीहोन राजा आणि त्याच्या लोकांचा पराभव केला.


आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या टोकाशी वसलेल्या अरोएर शहरापासून सिर्योन पर्वतापर्यंत, ज्याला हर्मोन पर्वत असेही म्हणतात,


याहवेहने जशी तुम्हाला विश्रांती दिली आहे तशीच त्यांनाही देईपर्यंत आणि याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना जो प्रदेश देत आहेत, त्याचा ताबा घेईपर्यंत तुम्ही त्यांची मदत करावी. त्यानंतर तुम्ही परत जाऊ शकता आणि जो यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश याहवेहचा सेवक मोशेने तुम्हास दिला आहे, त्या स्वतःच्या प्रदेशात तुम्ही वास्तव्य करू शकता.”


सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी लबानोनाच्या खोर्‍यात असलेल्या बआल-गादपर्यंतचा सर्व प्रदेश. त्यांच्या सर्व राजांना त्याने हस्तगत केले व त्यांना जिवे मारले.


पूर्वेकडील व पश्चिमेकडील कनानी; अमोरी, हिथी, परिज्जी आणि डोंगराळ प्रदेशातील यबूसी लोकांना; आणि मिस्पाहच्या हर्मोन डोंगराच्या तळाशी राहणारे हिव्वी या सर्व लोकांना निरोप पाठवला.


मनश्शेहचे बाकीचे अर्धे गोत्र, रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना यार्देनेच्या पूर्वेकडे आपले वतन मिळाले होते, याहवेहचा सेवक मोशेने त्यांच्याशी ठरविल्याप्रमाणे तो प्रदेश त्यांना वाटून दिला होता.


आता याहवेह तुमच्या परमेश्वरांनी अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांना विसावा दिला आहे. तर आता यार्देनेच्या पलीकडे याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या प्रदेशातील तुमच्या घरी तुम्ही परत जा.


“नंतर त्यांनी एदोम आणि मोआब या देशांना वेढा घालून रानातून आणि पूर्वेकडील सीमेने प्रवास करीत मोआबाच्या सीमेच्या पलीकडे आर्णोन नदीजवळ तळ दिला. परंतु त्यांनी मोआबाच्या सीमेत प्रवेश केला नाही, कारण आर्णोन ही मोआबाची सीमा होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan