Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 11:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 इस्राएली लोकांच्या देशात एकही अनाकी जिवंत उरला नाही, मात्र गाझा, गथ व अश्दोद येथे काही उरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद यांतले थोडे उरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 11:22
19 Iomraidhean Croise  

परंतु तीन वर्षानंतर, शिमीचे दोन गुलाम, माकाहचा पुत्र आखीश, गथचा राजा याच्याकडे पळून गेले आणि शिमीला सांगण्यात आले, “तुझे गुलाम गथमध्ये आहेत.”


काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर ताबा घेतला आणि गथ व त्याच्या सभोवतालची गावे पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतली.


बरीयाह व शमा हे अय्यालोन लोकांचे कुटुंबप्रमुख होते व त्यांनी गथकरास पळवून लावले.


तो पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करण्यास गेला आणि त्याने गथ, याबनेह आणि अश्दोद यांच्या भिंती पाडल्या. त्यानंतर त्याने अश्दोदजवळ आणि पलिष्ट्यांमध्ये इतर ठिकाणी शहरांची पुनर्बांधणी केली.


ज्या वर्षी अश्शूरचा राजा सार्गोनने पाठविलेला सर्वोच्च सेनापती अश्दोदला आला आणि त्याने हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले—


फिलिप्प, अजोत या शहरात दिसून आला आणि पुढे प्रवास करीत कैसरीया येथे पोहोचेपर्यंत त्याला वाटेत लागलेल्या सर्व गावांमध्ये त्याने शुभवार्ता सांगितली.


गाझा शहरापर्यंत विखुरलेल्या गावातून वस्ती करून राहिलेल्या अव्वी लोकांवर कफतोरहून आलेल्या कफतोरी लोकांनी हल्ला चढवून त्यांचा संहार केला व त्या ठिकाणी वस्ती केली.)


तेथील लोक धिप्पाड व उंच आहेत—अनाकी वंशज! तुम्हाला त्यांच्याबद्दल माहीत आहे आणि तुम्ही हे ऐकले आहे: “अनाकी लोकांविरुद्ध कोण उभे राहू शकेल?”


कादेश-बरनेआपासून गाझापर्यंत आणि गोशेनपासून गिबोनापर्यंतचे प्रदेश यहोशुआने हस्तगत केले.


अनाकाचे पुत्र शेशय, अहीमान व तलमय या अनाकांच्या वंशजांना कालेबाने बाहेर घालवून दिले.


एक्रोनच्या पश्चिमेपासून अश्दोदच्या परिसरात असलेल्या गावांसहीत सर्वकाही;


अश्दोद व त्याच्या सभोवतालच्या वस्त्या व गावे, गाझा, त्याच्या वस्त्या व गावे, इजिप्तच्या नाल्यापर्यंतची गावे व भूमध्य समुद्राच्या काठापर्यंत.


यहूदाहने गाझा, अष्कलोन आणि एक्रोन ही—शहरे व त्यांच्या सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला.


ते लोक हे होते, पलिष्टांचे पाच शासक, कनानी, सीदोनी, व बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.


तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.


परमेश्वराचा कोश पलिष्टी सैन्याने हस्तगत केल्यानंतर त्यांनी तो एबेन-एजर येथून अश्दोदकडे नेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan